चंद्रपूर : सतत येणाऱ्या पावसामुळे शेतीचे कामे खोडांबली होती.दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शेतीच्या कामाना वेग आला आहे. अनुकूल वातावरण पाहून चेक विठ्ठलवाडा येथील पती,पत्नी कपाशीला खत टाकायला शेतात गेले. खत टाकीत असताना अचानक पत्नीच्या अंगावर विज कोसळली. पतीचा डोळ्यादेखत पत्नीने प्राण सोडला. या घटनेमुळे गोंडपिंपरी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ही दुदैवी घटना आज ( मंगळवार ) गोंडपिपरी तालुक्यातील चेक विठ्ठलवाडा येथे घडली.योगिता प्रकाश खोब्रागडे ( वय ३५ ) असे मृतक महिलेचे नाव आहे.
ही दुदैवी घटना आज ( मंगळवार ) गोंडपिपरी तालुक्यातील चेक विठ्ठलवाडा येथे घडली.योगिता प्रकाश खोब्रागडे ( वय ३५ ) असे मृतक महिलेचे नाव आहे.
जिल्हात अतिवृष्टी झाली. नदी, नाल्याना पूर आला. त्यामुळे शेतीची कामे खोडांबली होती. मात्र दोन दिवसापासून पावसाने उसंत घेतली. यामुळे शेत कामाना गती आली. गोंडपिपरी तालुक्यातील चेक विठ्ठलवाडा येथील योगिता, प्रकाश हे पती, पत्नी आपल्या शेतातील कपाशीला खत टाकण्यासाठी शेतात गेले होते. खत टाकीत असताना विज कोसळली. विज थेट योगिता खोब्रागडे हिचा अंगावर पडली.
या घटनेत योगिता हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पतीच्या डोळ्यादेखत पत्नीने जीव सोडला. घटनेची माहिती गोंडपिपरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतक महिलेच्यापच्यात पती, दोन मुली, म्हातारे सासू, सासरे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. योगिताच्या अवेळी जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.