• Mon. Jan 6th, 2025
    विधानसभा इतर कामकाज

    सोलापूरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांना निर्देश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. 25 : सोलापूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात येतील. वेगवेगळ्या घटनांमध्ये विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने मदत केली जाईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

    यासंदर्भात सदस्य श्रीमती प्रणिती शिंदे यांनी औचित्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीपाणी हा जिव्हाळ्याचा विषय असून सोलापूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील.

    ००००

    राज्यात केळी महामंडळासाठी ५० कोटींची तरतूद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २५ : राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन करण्यात येणार असून या महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

    सदस्य संजय सावकारे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed