• Mon. Nov 25th, 2024

    आप्तांचा धीर खचू लागला; इर्शाळगड दुर्घटनेतील मृतांची संख्या २७वर, अजूनही १००हून अधिक जण ढिगाऱ्याखालीच?

    आप्तांचा धीर खचू लागला; इर्शाळगड दुर्घटनेतील मृतांची संख्या २७वर, अजूनही १००हून अधिक जण ढिगाऱ्याखालीच?

    म. टा. वृत्तसेवा, अलिबाग : इर्शाळवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर शनिवारी, दोन दिवसांनंतर ढिगारा उपसण्याचे काम सुरूच होते. त्याचेळी या ठिकाणी आणखी दरडी कोसळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या, परंतु अद्याप शोध न लागलेल्या मृतदेहांचे, मृत प्राण्यांच्या मृतदेहांचे विघटन होत असल्याने त्या ठिकाणी दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता ढिगाऱ्यांखालून कुणीही बचावले असण्याची शक्यता आता धूसर होत चालल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

    इर्शाळवाडीतील ढिगाऱ्याखालून आतापर्यंत २७ मृतदेह हाती लागले आहेत. तर, १००हून अधिक जणांना सुखरूप वाचविण्यात यश आलेले आहे. १० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अद्याप १००हून अधिकजण आहेत. मृत जनावरांमध्ये गाय आणि बकऱ्यांचा समावेश आहे.

    शनिवारी पिंकी संदेश पारधी (२५), नांगी किसन पिरकड (५०), कृष्णा किसण पिरकड (२७), भारती मधु भुतांबरा (२२), हिरा मधु भुतांबरा (१७) यांचे मृतदेह हाती आले. मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे शुक्रवारी बचावकार्य थांबविण्यात आले होते. शनिवारी सकाळी ते पुन्हा सुरू करण्यात आले. इर्शाळवाडी येथील नागरिकांचे नातेवाईक, मित्र, आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर येथे येत आहेत. तसेच काही ट्रेकर्सही येथे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. जाण्या-येण्यासाठी एकच पायवाट आहे. त्यामुळे बचाव व मदतकार्य करण्यासाठी असलेल्या शासकीय यंत्रणेला तसेच सेवाभावी संस्था यांना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे नागरिक व ट्रेकर्सना प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.
    Irshalwadi Landslide: जीव वाचला, पण लेकरु अन् नवरा…; रानभाजी विकणाऱ्या महिलेची वेदनादायी कहाणी
    मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले पालकत्व!

    मुंबई : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतून बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या मुलांची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. ही मुले १८ वर्षांची होईपर्यंत त्यांचे शिक्षण व पालनपोषण ही संस्था करणार आहे.
    Irshalwadi Landslide: घर गेलं, वाचली तेवढी आठवणींची सुटकेस; पाणावलेल्या डोळ्यांनी अनंताचा निर्णय, वाडीवर पुन्हा…
    ‘पुनर्वसन नको,हमी द्या’

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ‘इर्शाळवाडीतील दरड दुर्घटनेत बचावलेल्या लोकांना घरे देऊन त्यांचे केवळ पुनर्वसन नव्हे, तर त्यांना शिक्षण आणि नोकरीची हमी द्या’, असे, ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed