मुंबई उपनगरांमध्ये गेल्या एक तासापासून जोरदार पाऊस सुरु आहे. अंधेरी सबवे मध्ये पाणी भरल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी वाहतूक बंद केलेली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
मुंबईत दुपारी १२ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर भागात जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळं मुंबईतील काही ठिकाणचे रस्ते देखील पाण्याखाली गेली आहे.
Parts of Andheri water logged owing to intense rains in Mumbai. https://t.co/YDFLHjtaCK pic.twitter.com/EbZa3Lw1vC
— Richa Pinto (@richapintoi) July 21, 2023
समुद्रात लाटा उसळणार
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार समुद्रात दुपारी अडीचच्या दरम्यान लाटा उसळण्याची शक्यता आहे. चार ते साडे चार मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तर, मुंबईत वेगवान वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. ४५ ते ५५ किमी वेगानं मुंबईत वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईकरांना कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईतील लोकल सेवा सुरु, रस्ते वाहतूक खोळंबली
मुंबईत जोरदार पाऊस सुरु झाला असला तरी अद्याप मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईनवरील रेल्वे वाहतूक सुरु आहे. अद्याप रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. काही ठिकाणी रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे.पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रा येथे पाणी भरले आहे. त्यामुळे मार्ग ठप्प होऊन हजारो वाहने अडकली आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावर जागोजागी ही स्थिती आहे. सायन रोड नं.२४ येथे पावसाचे पाणी भरल्याने सायन सर्कल ते सायन स्टेशन सिग्नल दरम्यान नियोजित मार्ग बंद करुन राणी लक्ष्मीबाई चौक, रोड नं.३ मार्गे बसमार्ग ७,२२,२५,१७६,३०२,३१२,३४१,४११,४६३ च्या बसगाड्या वेळ 13.35 पासुन परावर्तित करण्यात आलेल्या आहेत. मुंबईतील असल्फा मेट्रो स्थानकात पाणी साचलं असल्याची माहिती समोर आली आहे.
विमान वाहतुकीवर परिणाम
मुंबई विमानतळावरील उड्डाणे थांबण्यात आली आहेत. दुपारी १.२५ पासून फक्त एका विमानाचे उड्डाण शक्य झाले आहे. दृश्यता ६०० मीटरपर्यंत खालावली असून ३ हजार फुटावर वादळी ढग असल्याने उड्डाणांचा खोळंबा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही स्थिती १.५० मिनिटांपर्यंत कायम होती.