कुर्ला येथील हार्बर डाऊन लाईनवर पाणी साचल्याचं समोर आलं आहे. डाऊन हार्बर लाईन वडाळा ते मानखूर्द सेवा दुपारी पावणे तीनपासून बंद करण्यात आली आहे. अप हार्बर आणि मुख्य लाइन सुरु असल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली आहे. डाऊन हार्बर सीएसएमटी ते गोरेगाव आणि डाऊन हार्बर मानखुर्द ते पनवेल सुरु आहे.
मुसळधार पावसामुळं मुंबईतील बेस्टची वाहतूक वळवण्यात आली आहे. सायन येथील रोड क्रमांक २४ येथून होणारी वाहतूक आर.एल. चौक रोड क्रमांक ३ मार्गे वळवण्यात आली आहे. शेल कॉलनी चेंबूर येथील वाहतूक चेंबूरनाका मार्गे वळवण्यात आली आहे. हिंदमाता येथील वाहतूक नायगाव मार्गे वळवण्यात आली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक ५ ते १५ मिनिटांनी उशिरा धावत आहे. हार्बरवरील मानखूर्द ते वडाळा डाऊन लाई वाहतूक बंद आहे. पश्चिम रेल्वेची वेळेवर वाहतूक सुरु आहे.
मुंबईत दुपारी १ ते २ च्या दरम्यान किती पाऊस झाला?
रावळी कॅम्प : ३६ मिमी
एफएन वॉर्ड : ३४ मिमी
वडाळा पायर स्टेशन : ३० मिमी
कुलाबा : २९ मिमी
वरळी फायर स्टेशन : २७ मिमी
विक्रोळी : ५० मिमी
चेंबूर : ४२ मिमी
कुर्ला : ३६ मिमी
मरोळ : ६१ मिमी
विलेपार्ले, सांताक्रुझ : ४५ मिमी
अंधेरी : ४२ मिमी
