• Sat. Sep 21st, 2024
शिंदे गटाच्या नेत्याचे फडणवीसांच्या मर्जीतील आमदारावर गंभीर आरोप, सोलापुरात संघर्ष पेटणार?

सोलापूर: राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील अपक्ष आमदाराचे टेंशन शिंदे गटाच्या नेत्याने वाढवलं आहे. बार्शीचे अपक्ष आणि भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊतांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बार्शी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर यांनी गंभीर आरोप केले आहे.
बाळासाहेब थोरात दिसले विरोधीपक्ष नेत्याच्या आवेशात, प्रश्न मांडले, सरकारला धारेवरही धरले
मिळालेल्या माहितीनुसार, आ. राजेंद्र राऊत यांचे कुटुंब आणि त्यांच्या मित्र परिवाराची ७०० कोटी रुपयांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. मंगळवारी दुपारी श्रमिक पत्रकार संघात शिंदे गटाच्या भाऊसाहेब आंधळकरांनी जाहीर पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी यांनी पोलीस दलातून निवृत्त होताच शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण सुरू केले. बार्शी तालुक्यातील विद्यमान आमदारांचा विरोध करत मतांच राजकारण सुरू केलं. बार्शी विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील अपक्ष आमदारांचे टेंशन वाढवण्याचा काम शिंदे गटाच्या नेत्याने सुरू केले आहे.

नाशिकचे ६ आमदार नेले, पण पवारांनी शेरास सव्वाशेर शोधले, अजितदादांचं टेन्शन वाढलं!

बार्शी मतदारसंघात २०१९ साली निवडून आलेले बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी केली आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागामार्फत ही चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. १९९५ साली राजेंद्र राऊत यांकडे एक दुचाकी वाहन आणि सात एकर शेतजमीन होती. आज मात्र आ. राजेंद्र राऊत यांच्याकडे शेकडो एकर शेतजमीन आहे. कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. राजेंद्र राऊत हे स्वतः लोकसेवक असल्याने त्यांना अँटी करप्शन कायदा लागू आहे. त्या अनुषंगाने सीबीआय, अँटी करप्शन, इन्कम टॅक्स अशा विविध १७ शासकीय यंत्रणाकडे तक्रार केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed