• Sat. Sep 21st, 2024

माळशेज घाटात इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक; अपघातानंतर इन्होवा ३० फूट ओढ्यात कोसळली

माळशेज घाटात इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक; अपघातानंतर इन्होवा ३० फूट ओढ्यात कोसळली

पुणे : ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत असणाऱ्या माळशेज घाटाच्या सुरुवातील असणाऱ्या फांगुळगव्हाण या गावच्या हद्दीत गाव परिसरात कल्याण – अहमदनगर महार्गावर इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तर इन्होवा गाडी थेट शेजारी वाहत असणाऱ्या ३० फूट ओढ्यात जाऊन पडली. या वाहनातील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत असणाऱ्या माळशेज घाट परिसरात मुंबईच्या दिशेकडून येताना इन्होवा कार आणि नॅनो कारची समोरासमोर जोरात धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांची मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आले. मात्र इन्होवा कार घाटाच्या शेजारी वाहत असणाऱ्या ३० फूट ओढ्यात जाऊन पडली. यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

chandrayaan-3 Update: चांद्रयान-३ कुठे आहे? इस्रो दिले महत्त्वाचे अपडेट, उद्या दुपारी होणार आणखी एक…
या घटनेमुळे घाट परिसरात एकच गर्दी झाली होती. प्रशासनाकडून माळशेज घाटात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे घाटात फिरायला येताना अथवा प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आजचा घडलेला अपघात हा काळजात धस करणारा असाच आहे. माळशेज घाट परिसरात सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात धुके आणि रिमझिम पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे वाहनाचे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्यांसाठी आनंदाची बातमी, उद्यापासून मिळणार पैसे; जाणून घ्या कसे

दोन्ही गाड्यांची झालेली समोरासमोर धडक ही एकदम जोरात अशीच होती. नॅनो गाडीचे यात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed