बाजारात जिल्ह्यासह नंदुरबार, मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणांहूनही मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीची आवक होते. महिन्याभरापासून पावसामुळे बाजार समितीत भाज्यांची आवक कमालीची घटली आहे. अशातच पावसामुळे भाज्या खराब होण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच भाज्यांचे दर १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ बघायला मिळत आहे.
मांसाहाराला मागणी वाढली
उद्यापासून (दि.१८) अधिक श्रावणमास सुरू होत आहे. श्रावणासह अनेकांकडून अधिक श्रावणही पाळला जाणार असल्याने रविवारी चिकन, मटणला मागणी वाढली होती. याचबरोबर पावसामुळे शहरात राज्याच्या विविध भागातून येणारी मासळीची आवक काही प्रमाणात बंद आहे. त्यामुळे मच्छी बाजारात हलवा आणि सुरमई महागले आहेत. मासळीच्या दरांत २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. बाजारात सुरमई आणि हलवा ८०० ते एक हजार रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
भाज्यांचे दर (किलो-रुपये)
बाजार समिती गंगापूररोड काठे गल्ली परिसर
कारले – ८० १२० १००
दोडके – ८० १२० १००
गिलके – ८० १२० १००
भेंडी – ६० १२० ८० ते १००
हिरवी मिरची – १०० १६० १२०
टोमॅटो – ८० ते १०० १४० १४० ते १५०
वाटाणे – १८० २४० २००
बटाटा – १८ २५ ते ३० २५
कोबी – १० (नग) ४० (नग) २० (नग)
फ्लावर – १० (नग) ४० (नग) २० (नग)
कांदापात – १५ (मोठी जुडी) ४० २५
मेथी – ५० ते ६० (मोठी जुडी) ५० ४०
शेपू – ३५ ते ४० (मोठी जुडी) ४० २५
पालक – २० (मोठी जुडी) २५ १५ ते २०
कोथिंबीर – १०० (मोठी जुडी) २० १० ते २०