• Mon. Nov 25th, 2024

    रजतनगरीच्या इतिहासात नवे ‘सुवर्ण पान’; चांद्रयान- ३ च्या निर्मितीत खामगावचा बहुमूल्य वाटा

    रजतनगरीच्या इतिहासात नवे ‘सुवर्ण पान’; चांद्रयान- ३ च्या निर्मितीत खामगावचा बहुमूल्य वाटा

    बुलढाणा : नवनिर्मितीची बिजांकुरे रुजलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या मातीत मोठे सामर्थ्य असून या जोरावरच खामगावचे नाव इतिहासात अभिमानाने नोंदविल्या गेलेले आहे. यात आणखी एक मोठी भर पडली असून रजतनगरी खामगावच्या इतिहासात नवे सुवर्ण पान जोडले गेले आहे. आज दुपारी अवकाशात झेपावलेल्या चंद्रयान-३ च्या निर्मितीत खामगावचा बहुमुल्य वाटा आहे. या चंद्रयानात खामगाव एमआयडीसी मधील विकमसी फेब्रीकेशनचे थर्मल शिल्ड आणि श्रध्दा रिफायनरीच्या सिल्व्हर स्टलिंग ट्युब वापरण्यात आल्या आहेत. ही खूप मोठी उपलब्धी असून यामुळे आपल्या खामगावची देशात नवी ओळख निर्माण झाली आहे.

    भारताची महत्वाकांक्षी चंद्रयान- ३ मोहीम आज पासून सुरु झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर आज दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवल अंतराळ केंद्रावरुन चंद्रयान- ३ अवकाशात झेपावले. हे चंद्रयान बनविण्यासाठी असंख्य शास्त्रज्ञांची प्रचंड मेहनत लागलेली असून या चंद्रयानाच्या निर्मितीत रजतनगरी खामगावचे मोलाचे योगदान आहे.

    शेअर आहे की पैसे बनवण्याची मशीन, १० हजार रुपयांचे बनवले पाच लाख रुपये, अजूनही दम शिल्लक
    देशभरात प्रसिध्द असलेल्या खामगाव एमआयडीसीमधील विकमसी फेवीकेशनचे थर्मल शिल्ड या चंद्रयानात वापरण्यात आले आहेत. हे शिल्ड बनविण्यासाठी प्रचंड मेहनत लागली असून खामगावातील वस्तू चंद्रयानात वापरल्या जाणे ही खूप मोठी गोष्ट असून देशात खामगावची आता नवी ओळख निर्माण झाली आहे.

    मुकेश अंबानींना जगातील सर्वात श्रीमंत महिलेने मागे सारले, जाणून घ्या किती संपत्ती शिल्लक आहे
    या चंद्रयानात खामगाव एमआयडीसीमधील विख्यात श्रध्दा रिफायनरीकडून बनविण्यात आलेल्या सिल्व्हर स्टलिंग ट्यूब वापरण्यात आल्या आहेत. यामध्ये ९० टक्के चांदी आणी १० टक्के कॉपर असते. या आधी या सिल्व्हर स्टलिंग ट्यूब विदेशातून मागविण्यात येत होत्या. मात्र आता खामगावातील श्रध्दा रिफायनरीच्या सिल्व्हर स्टलिंग ट्यूब वापरण्यात येतात अशी माहिती श्रध्दा रिफायनरीचे संचालक शेखर भोसले यांनी दिली आहे.

    अदानी बदलणार आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचे चित्र, जाणून घ्या कसा असेल धारावीचा मेकओव्हर
    चंद्रयानात लागणाऱ्या वस्तू खामगावातून जाणे ही संपूर्ण खामगावकरांसाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे खामगावची नवी ओळख देशाला झाली असून खामगावच्या इतिहासात ही उपलब्धी सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed