अजित पवार काय म्हणाले?
काल काकींचं ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे. मला दुपारीच जायचं होतं ऑपरेशन झाल्या झाल्या, परंतु थोडाला विलंब लागला. कारण खातेवाटप जाहीर झाल्याने मी मंत्रालयात होतो, विधानभवनात होतो. अधिवेशन सोमवारपासून असल्यामुळे मला विधानसभा अध्यक्षांशीही बोलायचं होतं, असं अजित पवार म्हणाले.
मी फोन केला, त्यावेळेस सुप्रिया सुळेंनी सांगितलं की दादा आम्ही आता सिल्व्हर ओकला निघालो आहोत, तर तू तिथेच ये. मला काकींना काहीही करुन भेटायचंच होतं, राजकारण आपल्या जागी, शेवटी आपली भारतीय संस्कृती आहे, परिवाराला आपण महत्त्व देतो. पवार कुटुंबीयांची परंपरा आम्हाला आजी-आजोबांनी शिकवली आहे, नंतरच्या पिढीत आई-वडील, काका काकींनी शिकवली आहे. म्हणून अर्धा तास भेटायला गेलो, असं अजितदादांनी सांगितलं.
मी काकींची विचारपूस केली, ख्याली खुशाली जाणून घेतली. पुढचे २१ दिवस काळजी घ्यावी लागेल. माझ्या अंतर्मनाने सांगितलं, आपल्याला तिथे गेलं पाहिजे. म्हणून मी तिथे गेलो. पवार साहेब तिथे होते, सुप्रिया तिथे होती, काकी तिथे होत्या, काही अडचण आहे का? असा उलट प्रश्नच अजित पवारांनी पत्रकारांना विचारला.
पवार साहेबांचं घर आहे, मी रात्री साडेआठला तिथे गेलो, त्यामुळे ते तिथे असणारच ना. मधल्या काळातील घडामोडींवर चर्चा झाली नाही, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.