रेल्वे विभागाच्या वतीने जानेवारी २०२२ ते मे २०२३ या काळात विभागाला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारावर पहिल्या २० स्थानकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात दक्षिण मध्य रेल्वे विभागात सिकंदराबाद या स्थानकाला सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे. यानंतर विजयवाडा, तिरूपती, काचीगुडा, हैदराबाद डेक्कननंतर नांदेड स्थानकाचा क्रमांक आहे. नांदेडनंतर राजमुंद्री, रेणीगुंटा जंक्शन असा दोन दक्षिण भागातील स्थानकांचा क्रमांक लागतो. नवव्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर स्थानक आहे.
दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत २० स्थानकांच्या यादीत मराठवाड्यातील तीन स्थानकांचा समावेश आहे. विसावा क्रमांक परभणी जंक्शनचा आहे. उर्वरित सर्व स्थानके दक्षिण भागातील आहेत. ही यादी रेल्वे अभ्यासकांकडून देण्यात आलेली आहे. येथून सध्या छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद या रेल्वेसह छत्रपती संभाजीनगर-रेणीगुंटा आणि आठवड्यातून एक दिवस फक्त छत्रपती संभाजीनगर-नांदेड मार्गासाठी एक गाडी आहे. याशिवाय लांब पल्ल्यासाठी किंवा मध्यम पल्ल्यांसाठी शहरांसाठी एकही रेल्वे येथून सुरू होत नाही, असे असतानाही छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेतून जाणाऱ्या प्रवाशांच्या जोरावर स्थानकाने नववा क्रमांक मिळविला आहे, अशीही माहिती रेल्वे अभ्यासकांनी दिली.
दहा रेल्वेस्थानकांचे उत्पन्न
स्थानकाचे नाव उत्पन्न (रुपयांत)
सिकंदराबाद १६०१,६३,५३,६४२
विजयवाडा जं ६३८,३७,५०,३७८
तिरूपती ५७८,०५,७२,५१९
काचीगुडा ३२३,३१,१७,८९६
हैदराबाद डेक्कन २६६,८३,७४,३४१
नांदेड २२४,७८,८२,४५८
राजमुंद्री १६४,०५,३२,९२४
रेणीगुंठा जं १४४,१०,१९,६१८
छत्रपती संभाजीनगर १३२,१३,६९,११५
गुंटूर जं. १३०,४९,८०,३००