• Mon. Nov 25th, 2024
    बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेकडे वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे, भाजप पदाधिकाऱ्यांची फडणवीसांकडे मागणी

    अहमदनगर : गेल्या काही काळापासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याने विरोधी पक्षांकडून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. त्यासोबतच आता नगरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनीही अशा घटनांकडे वैयक्तिकरित्या लक्ष घालावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
    कोकण दौऱ्यात राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले, लक्षात ठेवा येथील पुढचा आमदार मनसेचा
    अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही काळापासून खून, दरोडे आणि जातीय तणावाच्या घटना घडत आहेत. याकडे लक्ष वेधत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आणि जिल्हा उपाध्यक्ष सचिन पारखी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. गंधे आणि पारखी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, नगर शहरात सातत्याने अनेक छोटे मोठे गुन्हे आणि विचित्र घटना होत आहेत. अनेकदा जातीय तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे नगर शहरात कायदा सुव्यस्थेचा बोजवारा वाजला आहे. नगर शहरात बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेकडे आपण वैयक्तिक लक्ष द्यावे.

    राजूर घाटात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबात संजय गायकवाड संतप्त; पोलिसांसह ग्रामस्थांनाही धारेवर धरलं

    नगर शहरात सातत्याने अप्रिय आणि वाईट घटना होत आहेत. काही समाजकंटक जाणूनबुजून या घटना घडवत आहेत. त्यामुळे शहरातील शांततेस बाधा निर्माण होत आहे. पोलीस प्रशासन समाजकंटकांवर कारवाई न करता अनेकदा बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे नगर शहरात अशांतता निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत बिघडत असलेली नगर शहराची कायदा सुव्यवस्था सुरळीत होण्यासाठी उपमुख्यमंत्री या नात्याने आपण वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणी गंधे आणि पारखी यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यामध्ये लक्ष घालून संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed