• Mon. Nov 25th, 2024

    अजितदादांना अर्थ खातं दिलं आणि शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळलं, पवार समर्थक आमदाराने डिवचलं

    अजितदादांना अर्थ खातं दिलं आणि शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळलं, पवार समर्थक आमदाराने डिवचलं

    जळगाव : राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता खातेवाटप जाहीर झालं आहे. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यात आलं आहे. अजित पवारांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी होती. मात्र असं असतानाही अजित पवार यांना आज खाते वाटपात अर्थ खातं देण्यात आल्यामुळे नाराज असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आमदारांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना डिवचलं आहे.
    एक नव्हे दोन खाती राष्ट्रवादीला गेली, आवडतं खातंही गेलं, नाराजीच्या चर्चेवर गिरीश महाजन बोलले…
    महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं होतं. निधी मिळाला नाही, त्यामुळे शिवसेनेचे आमदारांमध्ये नाराजी होती. याच कारणावरून शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला होता. अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी होती. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांना आता अर्थ खातं देण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटाच्या आमदारांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज झालेल्या खातेवाटपात अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आल्याचं दिसतंय. यातून शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आलं आहे, अशी बोचरी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
    पहाटेचे बंड फसले, साहेबांनी पंख छाटले; पण दादा सत्तेत जाताच धनंजय मुंडेंना पॉवरफुल्ल खाते
    अर्थ खातं चालवण्यासाठी अनुभवी नेता असणं गरजेचं होतं. कारण येत्या काही दिवसातच विधिमंडळाचं अधिवेशन आहे. त्यामुळे अजित पवार हे अनुभवी आणि अभ्यासू आहेत. म्हणूनच अजित पवार यांना हे खाते दिलं असावं, असं खडसे म्हणाले.

    एक-दोन खाती इकडं-तिकडं गेली तर झालं काय?; खातेवाटपानंतर मंत्री गुलाबराव पाटलांची पहिली प्रतिक्रिया

    मंत्री अनिल पाटील यांना मदत पुनर्वसन खातं मिळालं आहे. वाघुर धरण, हतनुर धरण तसेच केळी नुकसानग्रस्त शेतकरी यांच्यातील मदत पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. जिह्यात आता तीन मंत्री असल्यामुळे विकासाला वेग यावा, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.

    ६०२ या दालनावरून खडसेंनी सांगितला आपला अनुभव

    मंत्रालयातील ६०२ हे दालन शापित दालन असून ते दालन कोणी घ्यायला तयार नाही. मंत्रीपद मिळाल्यानंतर या दालनात राहिलेल्या नारायण राणे, छगन भुजबळ, विजयकुमार गावित आणि माझ्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. इतके जण गेले. त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. म्हणून हे दालन घ्यायला कोणी तयार नाही. अशाप्रकारे एकनाथ खडसे यांनी बोलताना स्वतःचा अनुभव यावेळी सांगितला. आणि हे दालन कशाप्रकारे शापित आहे किंवा त्याला का शापित म्हणतात हे स्पष्ट केलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed