• Mon. Nov 25th, 2024
    Sanjay Bansode: समर्थकाने साथ निभावली, अजितदादांनी जबर ताकद दिली

    २०१९ ला राष्ट्रवादीचे अनेक नवीन चेहरे आमदार झाले. आणि मविआ स्थापनेनंतर पहिल्यांदाच आमदार झालेल्या नेत्यांना मंत्री पदही मिळालं. यापैकीच एक नाव म्हणजे संजय बनसोडे. लातुरात काँग्रेस-राष्ट्रवादीचा बोलबाला असताना होतं राष्ट्रवादीला उद्गीरची जागा मिळवून दिली ती संजय बनसोडेंनी. मात्र, पहाटेचा शपथविधी असो की राष्ट्रवादीतील फूट संजय बनसोडे कायमच अजितदादांची ताकद बनले. त्यामुळेच अजित दादांनाच पक्ष मानून काम करणाऱ्यांमध्ये बनसोडेंचं नाव घेतलं जातं. कोण आहेत संजय बनसोडे आणि अजितदादांच्या प्रतिकात्मक राजकारणासाठी त्यांचा कसा फायदा होऊ शकतो, ते समजून घ्या…

    संजय बनसोडे हे लातूरमधील उद्गीर या दलितांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. २०१९ ला पहिल्यांदा आमदार झाले असले तरी राजकारणात पाय रोवण्यासाठी तीन दशकांपासून प्रयत्न केले.

    > भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेतून राजकारणात एन्ट्री
    > १९९२ ला काँग्रेस सोबत जोडले गेले, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड
    > १९९९ मध्ये राष्ट्रवादी सोबत वाटचाल, लातूर जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी

    १९९३ ला शरद पवार मुख्यमंत्री झाले, तेव्हा मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीने पुन्हा जोर धरला. त्यावेळी शरद पवारांनी मराठवाडा दौरा केला. त्यावेळी पवारांच्या दौऱ्यात संजय बनसोडे सामील झाले होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पवारांसोबत जोडल्या गेलेल्या बनसोडेंनी समता परिषदेतही काम केलं. राष्ट्रवादीच्या संघटनेत प्रदेश पातळीवर काम केल्यानंतर २०१४ ला त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली.

    > २०१४ ला विधानसभेच्या मैदानात उतरले, पण २५ हजार मतांच्या फरकाने पराभव
    > २०१९ ला पुन्हा राष्ट्रवादीने विश्वास दाखवला, २० हजार मतांच्या फरकाने विजय
    > मविआ सरकारमध्ये राज्य मंत्री पदाची संधी
    > सहा खात्याचा कारभार
    > राष्ट्रवादीतील फुटीत अजित दादांना साथ मंत्री पदाची शपथ

    संजय बनसोडेंची ओळख ही अजितदादा समर्थक अशीच आहे. पहाटेच्या शपथविधीवेळीही संजय बनसोडेंनी अजितदांदांना साथ दिली होती. आताच्या बंडातही संजय बनसोडे अजितदादांसोबत राहिले. आणि त्यामुळे अजित दादांनी आपल्या समर्थकाचं कॅबिनेटमंत्री पदी प्रमोशन केलंय. मराठवाड्यातून येणाऱ्या दलित नेत्याला मंत्री मंडळात प्रतिनिधीत्व देऊन अजितदादांनी प्रादेशिक आणि सामाजिक संतुलन साधलंय. सत्तांतरानंतर शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्री पदाच्या प्रतिक्षेत असताना बनसोडेंनी झेप घेतलीय. दोन्ही सरकारमध्ये त्यांना चांगली संधी मिळालीय. अतिशय सामान्य कुटुंबातून येणाऱ्या संजय बनसोडेंचं राजकारण अजितदादांनी सेट केल्याचं बोललं जातंय. एकीकडे लातूरमधील भाजप नेते मंत्री पदासाठी वेटिंगवर असताना अजित पवार गटाचे संजय बनसोडेंनी मंत्री झाल्याने चर्चेत आलेत. शिवाय लातूरचं पालकमंत्री पदही बनसोडेंच्या पदरी पडू शकतं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed