• Wed. Nov 27th, 2024

    …अन्यथा डोक्यावर माठ फोडू; संभाजीनगरमधील महिलांचा महापालिका प्रशासकांना इशारा, काय कारण?

    …अन्यथा डोक्यावर माठ फोडू; संभाजीनगरमधील महिलांचा महापालिका प्रशासकांना इशारा, काय कारण?

    म. टा. प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर : ‘पाणी पुरवठ्याची वेळ निश्चित नाही. पाणीपुरवठ्याचा वार अनेकवेळा चुकतो. आठ दिवसांतून फक्त एकदाच पाणी येते. पाणीपुरवठा नियमित करा, नियमित पाणी द्या; अन्यथा अधिकाऱ्याच्या डोक्यावर माठ फोडू,’ असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रशासकांना दिला आहे.

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिडको एन ८ येथील शाखा संघटिका छाया देवराज यांच्या नेतृत्वाखाली महितांनी पालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे, ‘पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर आहे. अडीच वर्षांपासून पाणीपुरवठ्याची वेळ आणि वार चुकत आहे. आठ दिवसांतून एकदाच पाणी येते, त्यातही प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पाणीपुरवठ्याबद्दल वॉर्ड अधिकाऱ्यांना किंवा संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला तर ते फोन उचलत नाहीत. चुकून एखाद्यावेळी त्यांनी फोन उचललाच तर नीट उत्तर देत नाहीत. त्यामुळे आमच्या संयमाचा बांध तुटत चालला आहे.’

    ‘महिनाभरात पाण्याची वेळ आणि वार निश्चित करावा. पाणीपुरवठा नियमित करावा; अन्यथा मोठ्या संख्येने महिला महापालिकेच्या आवारात जमा होतील आणि प्रशासनाच्या निषेधार्थ माठ फोडतील. एखादा माठ अधिकाऱ्याच्या डोक्यात फोडला गेल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल,’ असेही निवेदनात म्हटले आहे.
    शाळकरी मुलांसह प्रौढांवर संकट; पाऊस सुर होताच सर्दी-खोकला-तापाचे रुग्ण वाढले, काय कारण?
    प्रशासक जी. श्रीकांत यांना निवेदन देताना छाया देवराज यांच्यासह स्वाती गुळवे, माधवी आमलेकर, मानसी आमलेकर, स्वाती भणगे, रंजना रसाळ, प्रतिमा दहिवाल, संगीता मिरगाळे, विमल तांबारे, रेखा देव, संध्या शास्त्री, स्वाती क्षीरसागर, कल्पना जाधव, वंदना मिसाळ, सानिका देवराज आदी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed