• Sat. Sep 21st, 2024
संतापजनक! अल्पवयीन मुलीवर १५ दिवसांपासून सामूहिक अत्याचार, हवेली परिसरात खळबळ

पुणे : आई-वडिलांना कोयत्याने जीवे मरण्याची धमकी देत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी मागील पंधरा दिवसांपासून वारंवार बलात्कार केल्याची संताप जनक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात बुधवारी (ता.१२) संध्याकाळी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या आईने मुलीकडे विचारपूस केली असता वरील धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

याप्रकरणी इरफान शेख (मुजावर) व आयुब शेख (मुजावर), (रा.दोघेही,दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली) या नराधमांविरूद्ध बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून लोणी काळभोर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Raj Thackeray: अरे हा मुख्यमंत्री तात्पुरता मी पर्मनंट अधिकारी; राज ठाकरेंची मुख्यमंत्री, फडणवीसांवर टीका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीची आई ही उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात कुटुंबासहित राहतात. मंगळवारी रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी मुलीची आई या बाहेर आल्या होत्या. यावेळी मुलगी अभ्यास करीत असलेल्या खोलीच्या बाहेर आयुब मुजावर हा दिसून आला. यावेळी पिडीतेच्या आईला आयुब मुजावर याने पहिले असता पळून गेला. मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिले असता यावेळी खोलीत इरफान मुजावर हा खोलीत दिसून आला. मुलीच्या आईला पाहून तो तेथून पळून गेला.

मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी; EWS घटकांच्या उत्पन्न निकषात मोठा बदल, लाखो नागरिकांना फायदा
मुलीच्या आईने मुलीकडे अधिक चौकशी केली असता तिने सांगितले की, आई, वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन मागील पंधरा दिवसांपासून तिच्यावर दोघेजण बलात्कार करत होते. मात्र दोघांकडून आई वडिलांच्या जिवाला भिती असल्याने, मागील पंधरा दिवसांपासून दोघांचे अत्याचार ती निपुटपणे झेलत होती. मंगळवारी संध्याकाळी तिच्याशी आळीपाळीने बळजबरीने शरीरसंबंध करण्यासाठी आरोपी आले असल्याची माहिती पीडित मुलीने तिच्या आईला सांगितले. यावरून पीडित मुलीच्या आईने इरफान शेख व आयुब शेख यांच्या विरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कायदेशिर तक्रार दिली आहे.
मी मृत्यूची वाट पाहत होते; नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक खुलासा… ठाकरेंबाबत व्यक्त केली नाराजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed