• Sat. Sep 21st, 2024
सीमा हैदरला पाकला पाठवा, नाहीतर २६/११ सारखा हल्ला करू; मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

मुंबई : मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली आहे. या कक्षाला धमकीचा फोन आला आहे. फोन करणार्‍याने उर्दू भाषेत सांगितले की सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवले नाही तर भारत उद्ध्वस्त होईल. या कॉलरने पुढे धमकी दिली की भारताला २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहावे लागेल आणि असे झाल्यास उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल. सध्या पोलीस या कॉलची चौकशी करत आहेत. यापूर्वीही मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात असे अनेक कॉल आले आहेत.

प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, १२ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये सीमा हैदरला पाकिस्तानला परत पाठवण्याचा कॉल आला होता. सीमाला परत न पाठवल्यास भारताने दहशतवादी हल्ल्यांसाठी तयार राहावे, अशी धमकी या कॉलरने दिली. त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Raj Thackeray: अरे हा मुख्यमंत्री तात्पुरता मी पर्मनंट अधिकारी; राज ठाकरेंची मुख्यमंत्री, फडणवीसांवर टीका
कोण आहे सीमा हैदर?

सीमा हैदर ही पाकिस्तानातील सिंध प्रांतातील जैसमाबाद येथील रहिवासी आहे. कागदपत्रांनुसार तिचा विवाह गुलाम रझा नावाच्या व्यक्तीशी २०१४ मध्ये झाला होता. त्याला चार मुलेही आहेत. २०१९ मध्ये गुलाम रझा कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला आणि तेथून सीमाला पैसे पाठवत असे. सीमाच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर तो कधीच परत आला नाही. दरम्यान, २०२० मध्ये सीमाने PUBG गेमच्या माध्यमातून ग्रेटर नोएडाच्या जेवर येथील रहिवासी असलेल्या सचिनशी मैत्री केली.

मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी; EWS घटकांच्या उत्पन्न निकषात मोठा बदल, लाखो नागरिकांना फायदा
नोएडा पोलिसांनी केली होती अटक

दोघेही प्रेमात पडले आणि या वर्षी मार्चमध्ये दोघांनी नेपाळमध्ये लग्न केले. यानंतर दोघेही मायदेशी परतले होते. सीमा १२ मे रोजी नेपाळमार्गे भारतात दाखल झाली आणि सचिनच्या घरी पोहोचली. सीमा हैदरला बेकायदेशीरपणे भारतात राहिल्याबद्दल अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सचिनलाही नोएडा पोलिसांनी अटक केली होती. नंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला.

नाशिक एसटी बस अपघात: बस ४०० फूट खोल दरीत कशी कोसळली?, बचावलेल्या कंडक्टरनं सांगितलं कारण, पाहा व्हिडिओ
सीमाने म्हटले, ‘माझ्या जीवाला धोका’

सीमाने पाकिस्तानला परत पाठवल्यास जीवाला धोका आहे. त्यांना भारतात राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी योगी सरकारकडे केली आहे. सीमाचा दावा आहे की तिने स्वतःच्या इच्छेने हिंदू धर्म स्वीकारून सचिनशी लग्न केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed