• Sat. Sep 21st, 2024

फिरला भिडू बच्चू कडू, शिंदेंच्या एका फोनवर बच्चूभाऊंनी निर्णय बदलला, मंत्रिपदाबाबत म्हणतात…

फिरला भिडू बच्चू कडू, शिंदेंच्या एका फोनवर बच्चूभाऊंनी निर्णय बदलला, मंत्रिपदाबाबत म्हणतात…

अमरावती: जिल्ह्यातील एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू हे मागील अनेक दिवसांपासून मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे सरकारचा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र त्यातही बच्चू कडून फक्त राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला नाही. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रहार संघटनेचे नेत बच्चू कडू यांनी आपण भूमिका स्पष्ट करणार असून मंत्री पदाचा दावा सोडणार असल्याचे सांगितले होते. मात्र ऐन वेळेवर बच्चू कडू यांनी भाकरी फिरवत मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉल आला व त्यांनी १७ तारखेला चर्चेसाठी बोलावल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मी १८ जुलै रोजी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. ते गुरुवारी अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंची इच्छा अपूर्ण राहणार, या कारणामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. मात्र, यावेळीही मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता कमी असल्याने बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा होती. बच्चू कडू यांनी नव्याने आकाराला आलेल्या सरकारच्या स्थिरतेविषयी शंका उपस्थित केली होती. तसेच अजित पवार यांना अर्थखाते देण्याविषयी शिंदे गटात नाराजी असल्याची बाब बोलून दाखवली होती. तसेच बदलत्या राजकारणाला कंटाळून मंत्रिपदाचा दावा सोडणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकारपरिषदेत बच्चू कडू टोकाचा निर्णय घेणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु, बच्चू कडू यांनी तुर्तास कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर न करता १८ जुलैपर्यंत वेट अँड वॉचचे धोरण स्वीकारले आहे. मुख्यमंत्र्यांनी फार विनंती केल्याने सध्या हा निर्णय मागे घेत असल्याचे त्यांनी म्हटले. १७ तारखेला मुख्यमंत्री शिंदे यांनी मला चर्चेसाठी बोलावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्याचे गुलाम राहू. काम,पद, हे तर येत राहील. पण विश्वास जर का गेला तर तो परत येत नाही. आम्ही सामान्यांसाठी लढू शकतो, मरु शकतो पण चापलुसी करु शकत नाही. पद घेण्यापेक्षा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्री पेचात असताना त्यांना मदत करण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हाला अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीच देणेघेणे नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

आधी मंत्रिमंडळ विस्तार मग खातेवाटपाचं तोरण, कुणाला लॉटरी तर काहींना डच्चू? धुसफूस टाळण्यासाठी दिल्लीत प्लॅनिंग

उद्धव ठाकरेंचे आभार मानतो पण….

मला महाविकास आघाडीत मंत्रिपद दिल्याने मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. आम्हाला अनेकवेळा अनेकांनी आमिष दिले तरीही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. उद्धव ठाकरे यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं असतं तर गुवाहाटीला जाण्याची वेळ आली नसती. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्यांचे गुलाम राहू, असे बच्चू कडू यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

खातेवाटपावरुन नाराजी; बच्चू कडू म्हणाले, अजित पवारांना अर्थमंत्री पद देऊ नये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed