• Sat. Sep 21st, 2024

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर मोह आवरता आला नाही; पोलीस ठाण्यातील ASIने निरीक्षकाच्या नावाने…

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर मोह आवरता आला नाही; पोलीस ठाण्यातील ASIने निरीक्षकाच्या नावाने…

सोलापूर: सोलापूर अँटी करप्शन युनिटने कारवाई करत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय मनोहर मोरे (वय ५७ वर्ष, नेमणूक विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल न करण्यासाठी पीआयला पैसे द्यावे लागतात, असे सांगून तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच मागितली; त्यामधील ३ लाख रुपये घेण्यास संमती दाखवली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यातील एएसआय संजय मोरे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तरी देखील त्यांना लाचेचा मोह आवरता आला नाही.

तक्रारदाराने अँटी करप्शन विभागाकडे दाद मागितली होती

विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत संजय मोरे याच्याविरूद्ध तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली होती. विजापूर नाका पोलिसांनी पीकअप वाहन पकडले आहे, ते सोडण्याकरीता व गुन्हा दाखल न करण्याकरता पाच लाखांची लाच मागितली जात आहे, अशी तक्रार फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केली होती. त्याअनुषंगाने आज (बुधवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, चंद्रकांत कोळी, पोलिस हवालदार शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, सलिम मुल्ला, वाहन चालक पोलिस शिपाई राहुल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीत सिंह गायकवाड; १७० खोल्यांचे घर, संपत्ती २० हजार कोटी
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर लाचेचा मोह आवरला नाही

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही एएसआय संजय मोरे याला लाचेचा मोह आवरला नाही, हे विशेष. तो सध्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्याला त्याच्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. जागेच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारी अर्जावरून गुन्हा न दाखल करण्यासाठी मागितली पाच लाखांची लाच मागितली होती. पहिला हप्ता तीन लाख रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खातरजमा करून पुराव्याच्या आधारे सहायक फौजदार संजय मोरेला घरीच पकडले. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला संजय मोरे हा पोलिस ठाण्यात कमी अन् बाहेरच जास्त ड्यूटी करत होता.

नितेश राणेंची आक्षेपार्ह टिपण्णी अन् पुण्यात तृतीयपंथी आक्रमक; पोलिसांसह बाचाबाची, प्रकृती खालावली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed