• Sat. Sep 21st, 2024

शिंदेंचा शिलेदार अखेर मंत्रिमंडळात, भरत गोगावलेंचं मंत्रिपद फिक्स? लांडेंच्या भेटीने सस्पेन्स

शिंदेंचा शिलेदार अखेर मंत्रिमंडळात, भरत गोगावलेंचं मंत्रिपद फिक्स? लांडेंच्या भेटीने सस्पेन्स

मुंबई: पावसाळी अधिवेशनाला अखेर काही दिवस शिल्लक असताना मंत्रिमंडळाचा विस्तार कोणत्याही क्षणी होऊ शकतो. गेले दोन तीन दिवस मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठका सुरु आहेत. खात्यांसंदर्भात बोलणं झाली असली तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील एक गट सत्तेत सामील झाल्यामुळे आमदारांमध्ये मोठी नाराजी असल्याची पाहायला मिळत आहे. रात्री मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली होती या बैठकीत चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप मामा लांडे देखील उपस्थित होते . दिलीप लांडे यांच्या उपस्थितीने सर्वांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळाल्या.

अजित पवारांना अर्थखाते देण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी बच्चू कडूंचं वक्तव्य

भरत गोगावले, संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून भेटत आहे. तर दुसरीकडे दिलीप लांडे यांच्या भेटीने चौथं नाव दिलीप लांडे यांचा आहे का, असा प्रश्न सर्व आमदारांमध्ये उपस्थित झालेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सत्तेत प्रवेशामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. खात्यांमध्ये भागीदारी वाढल्याने मंत्री पदाच्या आमदारांची संख्या कमी झाली भरत गोगावले यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त देखील केली होती. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल अशी माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू संजय शिरसाट यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात दिलीप लांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात बोलणे टाळले. परंतु कालची बैठक ही जिल्हा जिल्ह्यामध्ये होणाऱ्या पावसाळा आणि पेरणी संदर्भात होती, अशी माहिती चांदीवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांनी दिली.

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, संध्याकाळचा मुहूर्त? आमदार निरोपाच्या प्रतीक्षेत

मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी होणार?

मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळीच होण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून अजित पवार यांच्या देवगिरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठींचे सत्र सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले आजचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज संध्याकाळीच मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न होण्याची शक्यता आहे.

रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला जाणार नाही, आमच्याकडेच राहिल हे नक्की : आमदार भरत गोगावले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed