• Sat. Sep 21st, 2024
समान नागरी कायदा हा मुस्लिमांचा अस्तित्व हिरावण्याचा डाव- असदुद्दीन ओवेसी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यघटनेच्या निर्मात्यांनी तसेच विधी सल्लागारांनी एखादा कायदा सर्वसामान्य नागरिकांवर थोपू नये. असा इशारा दिला आहे. असे असताना समान नागरी कायदा आणून मुस्लिमांचे अस्तित्व हिरावून घेण्याचा कुटील डाव आखला जात आहे. या कायद्यामुळे मुस्लिमांसह हिंदूंसह अन्य समाजाचे धर्माचे धार्मिक स्वातंत्र्य यामुळे धोक्यात येईल, असा इशारा ‘एमआयएम’चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिला.

तापाडिया नाट्यमंदिर येथे समान नागरी कायदा या विषयावर मंगळवारी (११ जुलै) चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आयोजित चर्चासत्रात शीख धर्माचे ग्रंथी खडकसिंगजी, बिशप रेव्हरंड मधुकर कसाब, भन्ते सत्यपाल, भन्ते बुद्धपाल, आमदार मुफ्ती ईस्माईल, धनगर समाजाचे संजय फटांगळे, गोपाल बच्छिरे, चुन्नीलाल जाधव यांच्यासह एझाज जैदी, अॅड. खिजर पटेल, मौलाना कवी फलाही, हाफिज अब्दुल अजीम यांच्यासह या चर्चासत्राचे आयोजनकर्ते खासदार इम्तियाज जलील यांची उपस्थिती होती.

स्वागताच्या उत्साहात कार्यकर्त्याकडून चुकून तोंडावर शाल पडली, असदुद्दीन ओवेसी संतापले

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणात, जातीयवादी शक्तींचा देशभरात समान नागरी कायदा आणण्याचा हा जुना अजेंडा आहे. याबाबत राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध कालखंडात विधी अभ्यासक तसेच तत्कालीन कायदेमंत्री यांनी हा प्रयोग देशहिताचा नसल्याचा अभिप्राय दिला आहे. असे असताना सध्याचे राज्यकर्ते समान नागरी कायदा आणत आहेत.

देशाचे पंतप्रधान हे म्हणतात एक देश दोन कायदा असे सांगत आहे. विदेशात अनेक देशांमध्ये विविध कायदे आहेत. मात्र, देशात विविध समाजाचे तसेच धर्माच्या पारंपारिक रीतीरिवाजाप्रमाणे आचरण करण्याचे राज्यघटनेने अधिकार दिले आहे. या कायद्यात बदल म्हणजे देशातील विविध धर्मजातींचे रीतीरिवाज, लग्न पद्धती, संपत्ती हस्तांतरणाच्या पद्धती, दत्तक विधानसह धार्मिक अनुष्ठानाच्या पद्धती धोक्यात येऊ शकतात. मुस्लिमांच्या आड सत्ताधारी हे आदिवासी, बौद्ध आणि इतर मागासवर्गीयांच्या धार्मिक अधिकारावर गदा आणू पाहात आहेत. देशाच्या दक्षिणपूर्व राज्यांमध्ये काही राज्यात क्रिमिनल प्रोसिजर कायदा लागू नाही. अशा राज्यात समान नागरी कायदा कसा आणला जाईल. अशा ठिकाणी हा कायदा लागू केला जाणार नाही, तर एक देश एक कायदा कसा होईल. असा सवालही ओवेसी यांनी केला.

ED प्रमुखांची मुदतवाढ बेकायदा; मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका
धर्मनिरपेक्ष पक्ष आता गप्प का?

‘देशात समान नागरी कायदा आणण्याचा डाव सुरू आहे. मात्र, धर्मनिरपेक्ष म्हणविणारे पक्षाचे नेते मूग गिळून गप्प आहेत. जेव्हा मुस्लिमांच्या विरोधात एखादा निर्णय येत असतो. तेव्हा हे पक्ष गप्प का असतात? ते का बोलत नाही?’ असा सवालही ओवेसी यांनी सभेत केला. ‘आदिवासी भागात जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कायद्याबाबत माहिती देऊन आदिवासींचे अधिकार कसे हिरावून घेतले जाणार याची माहिती द्यावी. या कामात मुख्यमंत्री शिंदे आणि आताच त्यांचे साथीदार झालेले अजित पवारांनीही मदत करावी,’ असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed