ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात रोड नंबर २१ येथे जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसची ९० मिमी व्यासाची पाइपलाइन फुटल्याने परिसरात एकाच घबराटीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच महानगर गॅस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गॅस लाइनचा वॉल बंद केला असून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रोड नंबर २१ बाँबे बियर कंपनीच्या बाजूला सोमवारी १० जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास महानगर गॅसची पाइपलाइन फुटल्याची धक्कादायक घटना घडली. ही पाइपलाइन ९० मिमी व्यासाची आहे. या पाइपलाइनला अज्ञात जेसीबीचा धक्का लागून ती फुटली आहे, अशी माहिती ठाणे महानगर पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.

या पाइपलाइनमधून एशर सोसायटीला गॅस पुरवठा केला जातो. ही पाइपलाइन फुटल्यामुळे अंदाजे १०० ते १२० ग्राहकांचा गॅस पुरवठा बंद झाला होता. या घटनेची माहिती मिळताच महानगर गॅस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी उपस्थित झाले.
सुरक्षेच्या दृष्टीने महानगर गॅस कर्मचारी यांनी घटना घडली त्या ठिकाणीच्या गॅस पाइपलाइनचा वॉल बंद करून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून रात्री उशिरा ही पाइपलाइन दुरुस्त करून सोसायटीची गॅस लाइन पूर्ववत केली.