• Mon. Nov 25th, 2024
    टोमॅटो खूपच महाग आहेत म्हणणाऱ्या ग्राहकाला वजन काट्याच्या मापाने मारलं!

    पुणे : राज्यात टोमॅटोचे दराने उच्चांक गाठलेला असताना एका व्यापाराला टोमॅटो २० रुपये पाव महाग म्हणल्याने त्याचा राग अनावर झाल्याने त्याने थेट ग्राहकाला शिवीगाळ करत वजन काट्याच्या लोखंडी वजनाने ग्राहकाला मारलं. यात ग्राहक जखमी झाला असून व्यापाऱ्याविरोधात ग्राहकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा सगळा प्रकार पुण्यातील वडगावशेरी भाजी मार्केट पुणे, येथे दि. ०५ रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अनिल गायकवाड (रा.वडगावशेरी, पुणे) असे या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोपाल गोविंद ढेपे (वय ४२ रा. गलांडेनगर, मदर तेरेसा नगर स्कुलजवळ वडगाव पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

    या बाबतची अधिक माहिती अशी अशी आहे की, पाच तारखेला सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास वडगाव शेरी भाजी मार्केट पुणे येथे फिर्यादी भाजी घेण्यासाठी गेले असताना, भाजी विक्रेत्याला टोमॅटोचा भाव विचारला असता त्याने टोमॅटो २० रु पाव असल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी व्यापाराला म्हणाला २० रुपये पावशेर भाव खूप महाग आहे. फिर्यादी असं म्हणताच व्यापाऱ्याचा राग अनावर झाला, त्याने थेट फिर्यादीला शिविगाळ सुरू केली.

    शिविगाळ का करतो, याचा जाब विचारला असता आरोपी व्यापाऱ्याने फिर्यादीच्या तोंडावर बुक्क्यांनी मारायला सुरूवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने वजन काट्याच्या लोखंडी मापाने फिर्यादीला मारहाण केली. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहे.

    टोमॅटोचे दर वाढले

    राज्यातील पावसाचा अनियमितपणा, गारपीट, प्रतिकूल हवामानामुळे टोमॅटोच्या आगार असलेल्या जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. टोमॅटोचे पीक काही भागात गारपिटीने गेले, यामुळे उत्पादन कमी झाले, यामुळे टॉमोटोने भाव वाढले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed