केलेले अपराध वाचवण्यासाठी कव्हर पाहिजे म्हणून अजित पवार भाजपसोबत गेलेत. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने ज्याला गुन्हेगार ठरवलं आणि हायकोर्टानेच एफआयआर दाखल करून घ्यायला सांगितलं. त्यामुळे संरक्षण देणाऱ्यांना कधीतरी याचा विचार करावा लागेल. असं म्हणत भाजपलाही सुनावलं आहे.
वसंतदादा निवृत्त होऊन जेव्हा राजस्थानचे गव्हर्नर झाले तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून सांगितलं की, तुम्ही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करा. म्हणजेच त्यावेळी वसंतदादांना शरद पवार हाच काँग्रेसमध्ये योग्य योग्य नेता दिसला. शरद पवारांच्या वागण्याला बेस आहे. दुसरीकडे अजित पवारांचं वागणं उथळ आहे त्यांना कोणतीही विचारधारा नाही. शरद पवार जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला याकडे शालिनीताईंनी लक्ष वेधलं.
नवीन निर्माण करून सिद्ध केलं. २०१९मध्ये एफआयआर दाखल झाल्यांनतर अजित पवारांना समन्स आलं, अजित पवारांचा स्वभाव धारिष्ट्याचा नाही तर लपून राहण्याचा आहे अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीका केली. तसेच आताही ते लपून राहण्यासाठीच भाजपच्या आश्रयाला गेल्याचा उल्लेख शालिनीताईंनी केला.
त्यावेळीदेखील अजित पवारांना तात्पुरतं संरक्षण देण्यासाठी शरद पवारांनी ईडीच्या कार्यलयात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गदारोळ झाला आणि अजित पवारांना तात्पुरतं संरक्षण मिळालं. अजित पवारांनी याची जाणीव ठेवायला हवी होती. त्यावेळी अजित पवारांची चौकशी झाली असती तर आज ते तुरुंगात दिसले असते अशा शब्दात शालिनीताई पाटलांनी अजित पवारांना फटकारलं.
दुसऱ्याच्या आश्रयाने जगणारा मनुष्य हा कितीवेळ जगणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सख्ख्या काकाला सोडून जे रात्रीच्या अंधारात शपथ घ्यायला जातात ते उद्या भाजपचा विश्वासघात कशावरून करणार नाहीत याचाही विचार करावा. मुळात पक्षातून बाहेर पडणाऱ्यांना काही ठोस कारण आहे का, पक्ष स्थापन झाल्यापासून २०१४ चा अपवाद वगळता तुम्ही कायम सत्तेत आहेत. मंत्री होता नंतर उपमुख्यमंत्री झाला तुम्हाला अजून काय द्यायला हवं होतं असा प्रश्न शालिनीताई पाटील यांनी उपस्थित केला.
शिखर बँकेने जे ४५ कारखाने विकले त्याच नेतृत्व शिखर बँकेमध्ये अजित पवार करत होते. अजित पवार यांच्यात पुरुषार्थ असेल तर लपाछपीचं राजकारण न करता दाखल झालेल्या गुन्ह्यांचा सामना करावा असं आव्हान शालिनीताई पाटलांनी दिलं आहे.