• Mon. Nov 25th, 2024

    दौंडमधील संतापजनक घटना; मजुराकडून तीन गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी तातडीने…

    दौंडमधील संतापजनक घटना; मजुराकडून तीन गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी तातडीने…

    दौंड : तीन गतिमंद मुलींवर संस्थेत काम करणाऱ्या मजुरानेच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना दौंड तालुक्यातील केडगाव-बोरीपार्थी येथे उघडकीस आली आहे. हा प्रकार पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये घडला आहे. संस्थेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका मजुराने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेने दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची तात्काळ दखल घेत पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

    याप्रकरणी आरोपी मोझेस सुभाष झोरे (३५ वर्षे, रा. केडगाव ता. दौंड) याच्या विरोधात यवत पोलीस स्टेशनमध्ये तीन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. झोरे याला अटक करण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव करीत आहेत

    दौंड तालुक्यातील केडगाव येथे रमाबाई मुक्ती मिशन ही मोठी सामाजिक संस्था असून या संस्थेमध्ये अनेक मूकबधिर, बेवारस मुलींचा सांभाळ करण्यात येतो. मात्र या सामाजिक संस्थेमध्ये गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचारासारखी अत्यंत चीड आणणारी घटना घडल्याने परिसरात संतप्त प्रतिक्रया उमटू लागल्या आहेत.

    रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; AC डब्यातून प्रवास करणाऱ्यांना दिली इतकी मोठी सवलत
    राज्यामध्ये अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून प्रशासनाने यावर कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचार हा चिंतेचा विषय होत चालला आहे. आजची केडगाव येथे घडलेली घटना ही हादरवणारी आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. अशा घटना घडत असतील तर महिला राज्यात सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर येत आहे.

    ठाण्यात ताफा थांबला, सुप्रियाताईंनी फ्रंटसीट सोडून अमोल कोल्हेंना जागा दिली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed