• Sat. Sep 21st, 2024

मोदींचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप, आता पवारांनी टाकला बिनतोड डाव; चौकशीची मागणी करत म्हणाले…

मोदींचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप, आता पवारांनी टाकला बिनतोड डाव; चौकशीची मागणी करत म्हणाले…

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघात जाहीर सभा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर झालेल्या या पहिल्याच जाहीर सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. आजच्या सभेत पवारांनी एक स्मार्ट खेळी खेळली असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच कात्रीत पकडलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी आपली सर्व सत्ता वापरून या नेत्यांची चौकशी करावी, आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा असेल, असं पवार यांनी म्हटलं आहे.

‘नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर हल्ला केला आणि आरोप केले. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मीच सांगतो तुमच्या हातात देशात सत्ता आहे, तुमची सगळी शक्ती वापरा आणि चूक असेल तर वाटेल ती शिक्षा करा, आम्ही तुमच्या बरोबर राहू,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आधी ज्या राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेत सामावून घेणाऱ्या भाजपची आता चांगलीच अडचण होणार आहे.

जातीयवादी नीलमताई… सुषमा अंधारे यांची घणाघाती पोस्ट, टीकेची सव्याज परतफेड

भुजबळांवरही अप्रत्यक्ष हल्लाबोल

मी इथे टीका करायला आलेलो नाही, तर माझी चूक मान्य करायला आलो आहे. या लोकांबाबतचा माझा अंदाज चुकला, पण ती चूक लवकरच दुरुस्त करणार, असं म्हणत शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

पवारांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

– बऱ्याच काळानंतर माझे येथे येणे झाले
– राजकारणात माझ्या सहकाऱ्यांनी माझी साथ सोडली
– जबाबदारी वाढल्याने माझे महाराष्ट्रात येणं कमी झाले होते
– महाराष्ट्रात ज्या जिल्ह्याने साथ दिली त्या जिल्ह्याचे नाव नाशिक
– कष्टकरी, शेतकरी, आदिवासी यांच्यावर संकटे आली पण कुणी साथ सोडली नाही
– काहींना विधानसभेत आणायचे होते म्हणून येवल्याची निवड केली
– मी माफी मागण्यासाठी आलो
– माझा अंदाज चुकत नाही, पण चुकला
– तुम्ही माझे ऐकून निवडून दिले
– माझे कर्तव्य आहे म्हणून माफी मागायला आलो
– मी पुन्हा येईन आणि योग्य विचार सांगेल
– मतदारसंघाचा इतिहास मोठा आहे
– स्वातंत्र्य लढ्यात या येवल्याचे मोठे योगदान
– आम्हाला काहींना शक्ती द्यायची आहे, नव्या जबाबदाऱ्या द्यायच्या आहेत
– काही गोष्टी चुकीच्या घडल्या त्याची दुरुस्ती केली पाहिजे
– तुम्ही वयाच्या भानगडीत पडू नका
– विचार आणि कार्यक्रमाची चिंता करा, वयाची करू नका
– वयाचा उल्लेख केला तर महागात पडेल
– काहींना लवकरच किंमत चुकवावी लागेल,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed