• Sat. Sep 21st, 2024

Vegetables Rate Hike: केवळ टोमॅटोच नाही, तर चवळी, गवारसह ‘या’ भाज्याही खाताय भाव, पाहा दर

Vegetables Rate Hike: केवळ टोमॅटोच नाही, तर चवळी, गवारसह ‘या’ भाज्याही खाताय भाव, पाहा दर

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : गेल्या महिनाभरापासून भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारातच दर वाढलेले असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर अगदी ८० ते १०० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहेत. या भाज्या घाऊन बाजारात ८ ते १० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत.

घाऊक बाजारात भेंडी, चवळी ४० रुपये किलो, गवार ५० रु, घेवडा ४५ रु., कारले ४० रु., ढोबळी मिरची, पडवळ ४० ते ४५ रुपये किलो, शेवगा ५० ते ६० रु., दोडकी, वांगी ४० ते ५० रुपये प्रतिकिलो आहेत. हिरवा वाटाणा ७० ते ८० रुपये किलो या दराने विकला जात आहे. तर टोमॅटो आणि हिरवी मिरची ७० ते ८० रुपये किलो आहे. किरकोळ बाजारात या सर्व भाज्या ८० ते १०० रुपये किलोच्या घरात आहेत. हिरवी मिरची १५० ते १६० रुपये किलो झाली आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटातील भाज्या कमी झाल्या असतानाच कोबी, फ्लॉवर आणि लाल भोपळा ही कसर भरून काढत आहेत. घाऊक बाजारात या तिन्ही भाज्यांचे दर ८ ते १० रुपये किलो आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात या भाज्यांना ४० ते ५० रुपये किलोने दर मिळत आहे. बदलत्या दरांनुसार हॉटेलमधील मेन्यूमध्येही या तीन भाज्या अधिक दिसत आहेत. तर हिरवी मिरची, टोमॅटोच्या वापरात हात आखडता घेतला जात आहे.
Vegetables Rate Hike: भाजीपाल्याच्या दरांनं गाठलं त्रिशतक, आले ते मिरची आणि वाटाणा दोनशे पार जाणून घ्या अपडेट
भाज्यांचे वाढलेले दर पाहता दररोजच्या थाळीत महागड्या भाज्या देणे शक्य होत नाही. त्यामुळे कमी दर असलेल्या भाज्या वापरून थाळी तयार करून द्यावी लागत आहे.-बबन पाटील, खानावळ चालक

किरकोळ बाजारात टोमॅटो, हिरवी मिरची खरेदी करण्यातच नियोजनातील निम्मे पैसे संपून जातात. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी कमी दर असलेल्या भाज्या खरेदी कराव्या लागतात. सध्या कोबी, फ्लॉवर, भोपळा यांचे दर कमी आहेत. त्यामुळे या भाज्याच घेतल्या घेत आहोत.- संगीता अटकारी, गृहिणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed