• Sat. Sep 21st, 2024

मोबाइलवर तरुणींचे फोटो पाठवत लॉजवर सुरू होतं सेक्स रॅकेट, पोलिसांकडून २ तरुणींची सुटका

मोबाइलवर तरुणींचे फोटो पाठवत लॉजवर सुरू होतं सेक्स रॅकेट, पोलिसांकडून २ तरुणींची सुटका

ठाणे : वेश्याव्यसायासाठी सोशल मीडियाचा वापर करून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ग्राहकांपर्यंत तरुणींचे फोटो पाठवून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला दलाल ‘बुलबुल’ ला आणि तिचा साथीदार रिक्षाचालक सुरेंद्र यादव याला ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सापळा रचून अटक केली आहे. कारवाई दरम्यान या पथकाने महिला दलालाच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका केली आहे. या दलाल आणि रिक्षाचालकाविरोधात भिवंडी येथील कोनगाव पोलीस ठाण्यात पिटासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुबंई-नाशिक महामार्गवरील विविध लॉजवर तरुणींना पैशाचे आमिष दाखवून त्याच्यांकडून देहविक्री करून सेक्स रॅकेट एक महिला दलाल चालवत असल्याची खात्रीदायक माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या प्रकरणी तपास करत असताना पोलीस पथकाने मंगळवारी ४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गवरील रांजणोली बायपास येथील सॉलिटीयर रेसिडेन्सी या लॉजिंग बोर्डिंगमध्ये सापळा रचला होता.

या छाप्यामध्ये महिला दलाल बुलबुलबानो ही शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ग्राहकांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर तरुणींचे फोटो पाठवून शरीरसुखाचा सौदा करीत असताना आढळून आली. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने सॉलिटीयर लॉज परिसरात बुलबुलबानो उर्फ बुलबुल हमीद खान (२४) आणि रिक्षाचालक सुरेंद्र बाडो यादव (३१) या दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी ताब्यात घेतलेल्या दलालाची झाडाझडती घेतली असता, त्यांच्याकडील मोबाईल फोनसह ७२ हजार ६० रुपये हस्तगत केले. शिवाय दलालाच्या तावडीतून २१ व २४ वर्षीय दोन तरुणींची सुटका केली.

RSS Chief मोहन भागवत यांचा फोटो स्टेटस ठेवल्याने दिली धमकी, लवकर फोटो काढ नाही तर…

दरम्यान, आरोपींविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाचे प्रवीण दिवाळे यांच्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तर पीडित तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. बुलबुलबानो ही अनेक महिन्यांपासून काश्मीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पिटा गुन्ह्यात फरार होती. बुधवारी ५ जुलै रोजी महिला दलालासह तिच्या साथीदाराला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कोनगाव पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अस्लेशा घाटगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed