भुजबळांचा शिवसेनेतील शाखाप्रमुख ते मुंबई महापौर आणि आमदारकी पर्यंतचा प्रवास बाळासाहेब ठाकरेंमुळे झाला. पण १९९१ विरोधी पक्ष नतेपदाबाबत डावलंलं गेल्याने भुजबळांनी शिवसेनेत बंड करण्याचं धाडसं केलं आणि बाळासाहेबांना जोर का झटका दिला.
> डिसेंबर १९९१ मध्ये छगन भुजबळांचं बंड
> ३६ आमदारांसोबत वेगळा गट स्थापन, अखेर फक्त १२ आमदारांच्या पाठिंब्यावर काँग्रेमध्ये प्रवेश
> बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांच्या मंत्री मंडळात समावेश
> ओबीसीच्या मुद्द्यावर शिवसेनेला काटशाह दिला
> युती सरकार काळात विधानपिरषद विरोधी पक्षनेते पद मिळताच भुजबळांनी शिवसेनाविरोधी राजकारण पुढे नेलं
> रेमश किणी हत्या प्रकऱणावरून राज ठाकरेंना अडचणीत आणलं
शिवसेनेपासून फारकत बाळासाहेब ठाकरेंविरोधात राजकारण कराणाऱ्या भुजबळांनी आता पवारांचीही साथ सोडलीय.
> शिवसेनेतून बंड केल्यानंतर शरद पवारांनी भूजबळांना अभय दिलं
> राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पहिले प्रदेशाध्यक्ष बनवलं
> आघाडी सरकार येताच तीन वेळा उपमुख्यमंत्री पदी संधी, उर्वरीत काळ मंत्री पदी कायम
> भ्रष्टाचाराच्या आरोपानंतरही मविआत मंत्री पद दिलं
बाळासाहेब ठाकरेंच्या बोटाला धरून राजकारण केल्यानंतर भुजबळांनी बाळासाहेबांनाही आस्मान दाखवलं.. त्यानंतर शरद पवारांना दैवत मानुन राजकारण केलं.. आणि शेवटी पवारांचीही साथ निभावली नाही.. २०१४ ते २०१९ ही पाच वर्ष वगळली तर जवळपास तीन दशकं भुजबळांना पवारांनी सत्तेचे दिवस दाखवले.. पण राष्ट्रवादीत उभी फूट पडण्याचा प्रसंग आला तेव्हा छगन भूजबळांनीही शरद पवारांना साथ दिली नाही. एवढंच काय तर पुलोदच्या प्रयोगाचा दाखला देत भुजबळांनी शरद पवारांनाच आरसा दाखवलाय. शब्द न ओलांडणाऱ्या भुजबळांनी आता पवारांच्या बाजूला बडवे असल्याची टीका केलीय.. भुजबळांनी शरद पवारांना सोडून अजितदादांसोबत जाण्याची भुमिका योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतंय.