• Sat. Sep 21st, 2024

बुलढाणा बस अपघाताची मोठी अपडेट; फॉरेन्सिक अहवाल अहवालात म्हटले, ‘ती’ ट्रॅव्हल्स बस…

बुलढाणा बस अपघाताची मोठी अपडेट; फॉरेन्सिक अहवाल अहवालात म्हटले, ‘ती’ ट्रॅव्हल्स बस…

बुलढाणा: समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. प्रवासाच्या गतीसोबतच अपघाताचा वेगही वाढला. गेल्या सहा महिन्यात हजाराहून अधिक अपघात या महामार्गावर झाले. शनिवारी १ जुलै झालेल्या खाजगी बस अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आता याच अपघाताचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडराजा जवळी पिंपळखुटा समृद्धी महामार्गावर एक जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हलच्या खाजगी बसला भीषण अपघात होऊन यात २५ जणांनी जीव गमावला. या भीषण अपघातानंतर हा अपघात नेमका कसा व का झाला याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. यावर आता फॉरेन्सिक फायर रिपोर्ट समोर आलेला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ समृद्धी महामार्गावर अपघात झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस संदर्भात फॉरेन्सिक फायर रिपोर्ट समोर आला आहे. फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर्स या मुंबईच्या संस्थेने त्या संदर्भात तपास करून एक अहवाल बुलढाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

यानुसार अपघात झाला तेव्हा बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये होती. जी मुळात ओव्हरटेकिंग लेन आहे. अपघाताच्या वेळी बसची गती ७० ते ८० किलोमीटर प्रति तास होती. अपघातग्रस्त बसचे समोरचे चाक सुरुवातीला साईन बोर्डला धडकले. त्यानंतर बस दहा फूट अंतरावर असलेल्या दुभाजकाला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की मागील टायर फुटला. टायरच्या आतील लोखंडी रिंग मोडकळीस आली. बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन उलटली. बसच्या समोरचा एक्सेल तुटून वेगळा झाला आणि डिझेल टँकवर आदळला. त्यामुळे डिझेल टँकमधले ३५० लिटर डिझेल सर्वत्र सांडले. डिझेल इंजिनच्या हॉट एक्झॉस्टच्या संपर्कात आले आणि बसने पेट घेतला. वाहतुकीचे नियम मोडून ही बस धावत होती, असा खुलासा या अहवालात करण्यात आला आहे.

अचानक आग लागली, लोकं झोपेत होते; पोलीस अधीक्षक सुनील कडासनेंनी सांगितलं भीषण अपघाताचं नेमकं कारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed