• Sat. Sep 21st, 2024

अजितदादांसोबत गेलेला आमदार शरद पवारांकडे परतला, म्हणाला, प्रतिज्ञापत्रावर आमच्या सह्या पण….

अजितदादांसोबत गेलेला आमदार शरद पवारांकडे परतला, म्हणाला, प्रतिज्ञापत्रावर आमच्या सह्या पण….

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा यावरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुरु झालेल्या राजकीय लढाईच्यादृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार यांच्याकडून नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी १ वाजता राष्ट्रवादीच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. तर अजित पवार यांच्या गटाकडून वांद्रे येथील एमईटी संस्थेत बैठक ठेवण्यात आली आहे. अजित पवार यांच्या गटाकडून खासगीत त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील ४२ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, बुधवारी सकाळी अजिदादांसोबत गेलेले दोन आमदार पुन्हा परतले आहेत. शिरुरचे आमदार अशोक पवार आणि आमदार किरण लहामाटे हे काहीवेळापूर्वीच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.

यावेळी आमदार अशोक पवार यांनी एक महत्त्वाचा दावा केला. अजित पवार यांच्याकडे ४४ आमदारांच्या सहीची प्रतिज्ञापत्रं असल्याचे सांगितले जाते. मात्र, या प्रतिज्ञापत्रांवर आमदारांच्या सह्या चुकीच्या पद्धतीने घेतल्याचा दावा अशोक पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बैठक बोलावली म्हणून मी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आलो आहे. अजितदादांकडून आमच्या सगळ्यांच्या सह्या घेण्यात आल्या. पण आम्ही सह्या करताना कागदपत्रांवर काय लिहले आहे, हे वाचले नव्हते, असे अशोक पवार यांनी म्हटले.

Maharashtra Cabinet: अजित पवारांना पुन्हा अर्थखाते, दिलीप वळसे-पाटील, अदिती तटकरेंना मोठी लॉटरी लागणार?

तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत असल्याची चर्चा असलेले आमदार किरण लहामाटे हेदेखील यशवंतराव चव्हाण सेंटरला पोहोचले आहेत. आमचं दैवत पवार साहेब आहेत. मी शरद पवार यांना भेटायला चाललो आहे. मी पवार साहेब समर्थक असल्याचे किरण लहामाटे यांनी म्हटले. यशवंतराव चव्हाण सेंटरवर दुपारी एक वाजता बैठक सुरु होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे किती आमदार याठिकाणी पोहोचणार, हे बघावे लागेल.

Ajit Pawar Camp: कार्यालयाची चावी हरवली, अजितदादांच्या गटाच्या नेत्यांना पावसात ताटकळत राहण्याची वेळ

शरद पवार यांच्यासोबत कोणकोणते आमदार असण्याची शक्यता?

१. जयंत पाटील : इस्लामपूर, सागंली
२.अनिल देशमुख : काटोल, नागपूर
३.रोहित पवार : कर्जत जामखेड, अहमदगनर
४.सुनील भुसारा : विक्रमगड पालघर
५. बाळासाहेब पाटील : कराड उत्तर, सातारा
६. जितेंद्र आव्हाड : मुंब्रा कळवा, ठाणे
७. मकरंद पाटील : वाई, सातारा
८. संदीप क्षीरसागर : बीड, बीड
९. प्राजक्त तनपुरे : राहुरी, अहमदनगर
१०. सुमनताई पाटील : तासगाव, सांगली
११. राजेंद्र शिंगणे : सिंदखेड राजा, बुलढाणा
१२. नवाब मलिक : अणुशक्तीनगर, मुंबई उपनगर
१३ : मानसिंगराव नाईक : शिराळा, सांगली
१४ : राजेश टोपे : घनसावंगी, जालना
१५. दौलत दरोडा
१६. अशोक पवार: शिरुर, पुणे
१७. सरोज अहिरे
१८. दिलीप मोहिते
१९. चेतन तुपे
२०. राजू नवघरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed