• Mon. Nov 25th, 2024
    Marathi News LIVE Updates: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यातील निवासस्थानाहून कराडकडे रवाना

    अजित पवारांसमोरील पर्याय काय?

    पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत होऊ शकणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना शिंदे गट यांच्यात आपला गट विलीन करणे – निवडणूक आयोगासमोर जाऊन आपला गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे सिद्ध करणे. मात्र, तोपर्यंत त्यांच्यावर सध्याच्या कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते? अजित पवारांचे बंडाचे प्रयत्न २००९पासून – सन २००४मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ७१ आणि काँग्रेसने ६९ जागा जिंकल्या, तरीही शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिल्याने नाराजी होती. – अजित पवार यांची बंडखोरीची भूमिका प्रथमच नाही. त्यांनी सर्वप्रथम २००९मध्ये शरद पवार यांच्या कार्यशैलीविषयी आणि त्यांच्या निर्णयांना उघड विरोध केला होता. त्या वेळी त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्यांचे बंड शमविण्यात शरद पवार यांना यश मिळाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *