• Mon. Nov 25th, 2024
    ५८ पैकी ५२ आमदारांनी साथ सोडली, निवडणुकीत सगळे पडले, किस्सा सांगत पवारांचा थेट इशारा

    मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. १९८० मध्ये ५८ पैकी ५२ आमदारांनी आपली साथ सोडल्याचा किस्सा पवारांनी यावेळी पुन्हा सांगितला.

    शरद पवार यांनी काय सांगितलं?

    प्रश्न राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्याबाबतचा- असा प्रकार इतरांना नवीन असेल, मला तो नवीन नाही. १९८० साली निवडणुकीच्या नंतर मी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत होतो. तेव्हा ५८ पैकी ६ सोडले तर सगळे पक्ष सोडून गेले होते. मी त्या ५८ चा विरोधी पक्षनेता होतो. पक्षाची मोट बांधण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरलो. पक्षाची बांधणी करण्याचं ठरवलं. जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा हीच संख्या ६९ वर गेली, असं पवार यांनी सांगितलं.

    महाराष्ट्रात राजकीय गदारोळ, उद्धव ठाकरे पुण्यातील धाडसी हिरोंची पाठ थोपटण्यात व्यस्त

    नेमकं काय घडलं होतं १९८० मध्ये?

    १९८० साली तब्बल ५२ आमदार शरद पवारांना सोडून गेले होते, पण पुढच्या निवडणुकीत त्यातला एकही निवडून आला नव्हता. १९७८ मध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुलोद सरकार स्थापन झालं आणि पवार मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. १९८० मध्ये इंदिरा गांधींचं सत्तेत पुनरागमन झालं आणि त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकार बरखास्त केली, यात पवारांच्या सरकारचाही समावेश होता.

    माझी छाती फाडली तरी शरद पवार दिसतील; ‘एकनिष्ठ’ नरहरी झिरवाळांची अजितदादांना साथ

    १९८० मध्ये काँग्रेसने महाराष्ट्रातील २८८ पैकी १८६ जागांवर विजय मिळवला. तर पवारांच्या समाजवादी काँग्रेसला केवळ ४७ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यांच्या गळ्यात विरोधीपक्ष नेतेपदाची माळ पडली. त्यानंतर एक-एक आमदार पवारांची साथ सोडत गेले. पवार लंडन दौऱ्यावर असताना मोठ्या संख्येने आमदारांनी काँग्रेस प्रवेश केला. त्यावेळी पवारांसोबत केवळ सहा आमदार राहिले आणि शरद पवारांना विरोधी पक्षनेतेपदही गमवावं लागलं होतं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed