नवी मुंबई: पावसाळा म्हटलं की प्रत्येकालाच हिरव्यागार नटलेल्या डोंगर दऱ्या, धबधबे , अशा विविध खळखळणाऱ्या पाण्याच्या आनंद घेण्याचे वेध लागले असतात. मात्र हौस मजेच्या नादात पाण्याचा वेग, खोली आणि इतर गोष्टी लक्षात न आल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. नवी मुंबईमधील घनसोलीमध्ये असलेल्या एका पाण्याच्या डबक्यात पोहायला उतरलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांचं नाव आयुष यादव असे असून तो आपल्या लहान भाऊ आणि एका मित्रा सोबत पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी गेला मात्र एन एम एम टी बस डेपो समोरील असलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत आयुष हा घनसोलीतील घरौदा गृहनिर्माण संस्थेत राहत होता. आयुष बारा वाजताच्या सुमारास आपला लहान भाऊ आणि एका मित्रासोबत पावसाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडला. घणसोली परिसरातील एनएमएमटीच्या डेपो समोरील रस्त्याच्या बाहेर एका खड्ड्यात पावसाचे पाणी साठले होते. त्याच पाण्यात आयुष पोहण्यास उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने काही वेळातच तो गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांनी आरडाओरडा केल्यावर आसपासचे काही लोक जमा झाले. मात्र, तोपर्यंत आयुष पाण्यात दिसेनासा झाला होता.

दरम्यान, उपस्थित काही लोकांनी पोलीस आणि अग्निशमन दलास माहिती दिली. अग्निशमन दलास माहिती मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता आयुष आढळून आला. त्याला खड्ड्याबाहेर बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले,अशी माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एन. औटी यांनी दिली.
पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचते. मात्र, साचलेल्या पाण्याची डबकी किती खोलवर आहेत याचा अंदाज न आल्यामुळेच आयुषला जीव गमवावा लागला आहे, आयुषच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.