• Sat. Sep 21st, 2024

मित्रा…अर्ध्यात साथ सोडलीस, सुदर्शन दातीर यांच्या निधनानं जळगाव-नाशिक पोलिस दल गहिवरले

मित्रा…अर्ध्यात साथ सोडलीस, सुदर्शन दातीर यांच्या निधनानं जळगाव-नाशिक पोलिस दल गहिवरले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक / सिडको : कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी तपासकामी जळगावच्या एरंडोल-कासोदा रस्त्यावर वाहनावर झाड कोसळल्याने त्यांचे गुरुवारी रात्री निधन झाले होते. या घटनेनंतर जळगा‌व पोलिस दलात तीव्र शोक व्यक्त होतानाच सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर यांचे पार्थिव नाशिकमध्ये दाखल झाले. संपूर्ण अंबड गाव त्यांच्या निधनामुळे शोकसागरात बुडालेले असताना सहकाऱ्याला अखेरचा निरोप देण्यासाठी दाखल झालेले पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला. दातीरांच्या पार्थिवाला अधिकाऱ्यांनी गहिवरलेल्या स्थितीत खांदा देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले.

दातीर यांच्या अपघाती निधनामुळे नातलगांसह पोलिसदल हादरले. ‘मित्रा…अर्ध्यात साथ सोडलीस’, असे म्हणत पोलिस दलातील त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांचे डोळे पाणावले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-कासोदा रस्त्यावरून जाताना आर्थिक गुन्हे शाखेच्या वाहनावर अंजनी धरणाजवळ रस्त्यावर गुरुवारी (दि. २९) रात्री झाड कोसळले. या अपघातामध्ये नाशिकच्या अंबड येथील रहिवाशी सहायक निरीक्षक सुदर्शन दातीर यांचे निधन झाले. शुक्रवारी (दि. ३०) सकाळी त्यांचे पार्थिव दाखल झाले. पंचक्रोशीतील रहिवाशांसहित पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.
Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव वधारला, खरेदीसाठी मोजावे लागणार जास्त पैसे
दातीर यांच्यावर दुपारी अंबड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहायक निरीक्षक यतीन पाटील, हेमंत नागरे यांच्यासह २०१२ च्या ‘पीएसआय’ तुकडीचे सर्व अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, दातीर यांच्या पश्चात आ‌ई, वडील, पत्नी, लहान मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
काच फोडून बाहेर आलो, एकाला खेचून काढलं न् मोठ्ठा स्फोट झाला; वाचलेल्या तरुणानं सांगितला थरार

– दातीर हे सन २०१२ मध्ये ‘एमपीएससी’ उत्तीर्ण

– मुंबईत ७ वर्षे विशेष कामगिरी

– सन २०१९ पासून जळगाव गुन्हे शाखेत सहायक निरीक्षक

– नाशिक, जळगाव, मुंबईतल्या ‘एपीआय’ शहरात दाखल

– सन २०१२ च्या तुकडीतील सहकाऱ्यांनी वर्दीवर दातीरांच्या पार्थिवाला खांदा

Buldhana Bus Accident : एसी स्लीपर बस उलटताच डिझेल टँक पेटला, एसपींनी सांगितला बुलढाणा अपघाताचा थरारक घटनाक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed