• Tue. Mar 10th, 2026

    समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

    ByMH LIVE NEWS

    Jul 1, 2023
    समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

    मुंबई, दि. १ – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या  झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

    या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

    अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे  जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

    ही दुर्घटना कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed