सुरतवरून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे मलकापूर बायपासवर टायर पंक्चर झाले. यामुळे ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. यात टायर बदलत असलेल्या चालकाच्या आणि बाजूला बसलेल्या गरोदर महिलेच्या अंगावरून ट्रक गेले. नऊ महिन्यांची गरोदर महिला अंजली जाधव हिचा उपचार दरम्यान बुलढाणा येथे मृत्यू झाला. अंजली जाधव ह्या सुरतवरून आपल्या माहेरी प्रसूतीसाठी जात होत्या. ट्रॅव्हल्सला धडक दिल्यानंतर आयशर ट्रक दुभाजकावरील पोलवर जाऊन धडकला. ज्यामध्ये ट्रकमधील चालक, क्लिनर आणि ट्रॅव्हल्स चालक यांचा जागीच मृत्यू झाला. गरोदरपणामुळे अंजलीला पटकन उठता आले नाही आणि सर्व काही संपले. इतक्यात नियतीने आपला डाव साधला आणि आयशर ट्रक ट्रॅव्हल चालकाला चिरडत महिलेच्या पायावरुन जात दुभाजकावरील पोलवर धडकला. यात ट्रॅव्हलचा चालक, आयशरचा चालक आणि क्लिनर जागीच ठार झाले. तर जखमी महिलेला तात्काळ आधी मलकापूर आणि नंतर बुलढाणा रेफर करण्यात आले. मात्र बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आई-वडिलांसोबत प्रसुतीसाठी गावी चालली होती अंजली
अंजली जाधव ही दिड वर्षाचा मुलगा आणि पतीसह वाशिम जिल्ह्यात आपल्या सासरी राहत होती. अंजलीचे पतीशी भांडण झाले होते. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून अंजली आपल्या आई-वडिलांसोबत सूरत येथे राहत होती. अंजली आई-वडिलांसोबत तेथे मोलमजुरीचे काम करत होती. अंजलीला आता नववा महिना लागल्याने तिचे आई-वडिल तिला घेऊन त्यांच्या मूळगावी बडनेरा येथे प्रसुतीसाठी घेऊन चालले होते. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आणि अंजलीचा दीड वर्षाचा मुलगाही होता.