• Sat. Sep 21st, 2024
दर्शना पवार हत्या प्रकरणाची व्याप्ती मोठी, राहुल हांडोरेबाबत न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे : दर्शना पवार खूनप्रकरणी अटकेत असलेला आरोपी राहुल हांडोरे याची पोलीस कोठडी येत्या सोमवारपर्यंत (तीन जुलै) वाढविण्यात आली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, असे नमूद करीत न्यायालयाने हांडोरेच्या कोठडीत वाढ केली.

आरोपी राहुल आणि दर्शना राजगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. तेथे गेल्यावर लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून राहुल आणि दर्शनात वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात दर्शनावर कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वेळा वार केले. त्यानंतर दगडाने मारहाण करून तिचा खून केला, अशी कबुली आरोपी राहुलने नुकतीच दिल्याचे पोलिसांनी सांगितले. राहुलला २१ जूनला रात्री उशिरा मुंबईत अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची आता आणखी एक ‘परीक्षा’
दरम्यान, दर्शनाच्या खुनासाठी वापरलेले कंपासमधील कटर पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केले आहे. आरोपी आणि दर्शना यांनी राजगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि खून करताना आरोपीने घातलेले कपडे पोलिसांनी जप्त केले असून, राहुल खून करून काही दिवस फरार झाला होता. फरार असताना त्याला कोणी मदत केली आहे का? तो नेमका कोणत्या ठिकाणी राहिला? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली.

त्यावर आरोपीच्या वतीने ॲड. गणेश माने यांनी युक्तिवाद केला. ‘गुन्ह्याचा प्राथमिक तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नसून, न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी,’ असा युक्तिवाद ॲड. माने यांनी केला. मात्र, न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवली.

TCS मध्ये ‘कॅश फाॅर जाॅब’; IT कंपनीची मोठी कारवाई, ६ कर्मचाऱ्यांसह स्टफिंग कंपन्या ब्लॅकलिस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed