• Sat. Sep 21st, 2024
Dhule News: अंगणवाडी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार; ठाकरे गटाचा गंभीर आरोप, आयुक्तांना धरलं धारेवर

धुळे: धुळे शहरासह ग्रामीण भागातील अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत लाच मागितल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून नव्याने प्रक्रिया राबवावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यासाठी उपायुक्तांना शिष्टमंडळाने तासभर घेराव घातल्याचे चित्र पहायला मिळाले. महिला बालकल्याण विभागाकडे अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी एक हजारापेक्षा अधिक अर्ज सादर झाले. या भरती प्रक्रियेत शैक्षणिक अर्हताप्राप्त उमेदवारांना शासनामार्फत परिपत्रकानुसार गुणांकन देण्यात आले होते. परंतु, स्थानिक महिला आणि बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी हे गुणांकन देतांना प्रचंड घोळ केला.
शिंदे गटाच्या त्या वादग्रस्त जाहिरातीवर आता मंत्री दीपक केसरकर यांचा मोठा दावा
या पदासाठी पात्र महिला उमेदवारांची आधी निवड करण्यात आली. शासनामार्फत याच कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांवर भरती प्रक्रियेची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर आता या कर्मचाऱ्यांनी उमेदवारांकडे लाखो रुपयांची मागणी केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यासंदर्भात असंख्य महिलांनी आपल्याकडे तक्रारी केल्याचा दावाही ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाने महिन्यापूर्वी या कार्यालयातील संबंधितांना जाब विचारला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे भरती प्रक्रियेवर स्थगिती आणावी, अशी मागणी केली.

जनता दलाची ऑफर नाकारून काँग्रेसची वाट का धरली? ; भुजबळांनी सांगितलं कारण

यासंदर्भात महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी विभागीय आयुक्त, महिला बालकल्याण विभाग यांच्याकडे लेखी तक्रार दिली. संबंधित भरती प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. तक्रारीची दखल घेऊन नाशिकचे उपविभागीय आयुक्त धुळे येथे चौकशीसाठी आले असता अन्यायग्रस्त महिला उमेदवारांना सोबत घेऊन जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, भरत मोरे, महिला आघाडीच्या संघटक हेमाताई हेमाडे, डॉ. जयश्री वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय आयुक्तांना तासभर घेराव घातला. उपविभागीय आयुक्तांनी अन्याय झालेल्या उमेदवारांनी आपले हरकतीचे अर्ज पुढील दोन दिवसांत कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व उमेदवारांची चार ते सहा जुलै रोजी प्रत्यक्ष सुनावणी धुळे येथील कार्यालयात घेण्याची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed