• Mon. Nov 25th, 2024
    आषाढी एकादशीसाठी १२ टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद; साई संस्थानचे सीईओ रमले भाविकांच्या सेवेत

    अहमदनगर: आषाढी एकादशी निमित्त शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई प्रसादालयात खास साबुदाणाच्या खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. या महाप्रसदासाठी तब्बल ११ ते १२ टन साहित्याचा वापर यासाठी करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त साईबाबांच्या मुर्तीला करोडो रुपयांचे सोन्याचे अलंकार आणि तुळशीमाळांचा साजसुद्धा चढवण्यात आलाय. पंढरपूर प्रमाणे साईंना विठ्ठल स्वरूप मानत हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. यावेळी साईप्रसादालयात साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी स्वतः भाविकांना खिचडीचे वाटप केले.

    ‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रद्धा-सबुरीचा’ संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी आज एकादशीच्या दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली. आषाढी एकादशी हा उपवासाचा दिवस लक्षात घेऊन भाविकांसाठी आज खास करुन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद देण्यात आलाय. सकाळी नाश्ता तसेच भोजनातही उपवासाची खिचडी देण्यात आली. साबुदाणा खिचडी , शेंगदाण्याची आमटी आज प्रसादलायात बनवली असून हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतील असा अंदाज घेत साईसंस्थानने तयारी केली होती.

    खिचडीचा प्रसाद बनवण्यासाठी १२ टन उपवासाच्या साहित्याचा वापर करण्यात आल्याचे संस्थानाच्या वतीने सांगण्यात आले. साबुदाणा सहा हजार किलो , शेंगदाणे पाच हजार किलो, बटाटे दोन हजार किलो यासह साखर मिरची असं साहित्य खिचडी महाप्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात आले. शिर्डी पंचक्रोशीतील स्थानिक भाविक आवर्जुन या प्रसादरुपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात सोबत देशभरातून आलेल्या भाविकांनाही आज प्रसाद भोजनात भाजी , पोळी , वरण – भाताएवजी साबुदाणा खिचडी मिळत असल्याने भाविकांनीही समाधान व्यक्त केले.

    दुमदुमली श्रीविठ्ठलाची पंढरी! आषाढी यात्रा सोहळ्यासाठी १० लाख भाविक पंढरीत दाखल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed