• Sat. Sep 21st, 2024
Pune News: पावसात जंगल सफारीचा मोह आला अंगलट; चार इंजिनिअरिंगचे तरुण चुकले वाट अन्…

लोणावळा: पावसाळा आला की मावळात भटकंती करण्याचे वेध लागतात. कारण पावसाळ्यात मावळातील निसर्ग बहरतो. असाच बेत पुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूट या कॉलेजच्या मुलांनी आखला. त्यानुसार त्यांनी पुण्यावरून थेट मावळ गाठलं. मावळ तालुक्यातील ढाक बहीरी या घनघाट अरण्यातील सुळक्यावर जाण्याचा बेत आखला. मजल दरमजल करत या जंगलात ते शिरले. मात्र सायंकाळी घराकडे येताना त्यांची वाट भरकटली आणि घरी येण्याचे मार्गच दिसेनासे झाले. येथे गुगल मॅपद्वारे ही मार्ग सापडत नव्हता. मात्र रेस्क्यु टीमने रात्रीच्या अंधारात साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या चार मुलांना शोधून काढले.
Weather Update: मुंबईत सकाळपासून संततधार, ९ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, ६ विभागांना ऑरेंज अलर्ट
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातल्या सिंहगड कॉलेजचे चार विद्यार्थी ट्रेनिंगसाठी लोणावळ्यातील बहिरी येथील सुळका सर करण्यासाठी गेले होते. मात्र तिथे दाट धुके आणि पाऊस असल्याने रात्री परतताना त्यांची वाट चुकली. या घाबरलेल्या अवस्थेत अनेकांना मदतीसाठी कॉल केले. परंतु रात्री ८:३० वाजता लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यु टीमला या चार मुलांची माहिती मिळाली. यानंतर शिवदुर्ग रेस्क्यु टीम यांनी आपदा मित्र मावळ वन्यजीव रक्षक टीम आणि कामशेत पोलिसांचा चमू आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गर्द किर्रर्रर अंधारात दगड धोंडे तुडवत सलग चार तासांच्या अथक परिश्रमानंतर या चार मुलांना शोधून काढले.

टोमॅटोने गाठली शंभरी; १०० ते १२० रु किलोनं विकला जात असल्यामुळे नागरिकांना महागाईचा चटका

मात्र शोधकार्यात पाऊस, धुके याची अडचण मोठी होती. तर लोकेशन मिळत नसल्याने त्याचा त्रास रेस्क्यु टीमला सहन करावा लागला. परंतु शोध पथक मुलांच्याजवळ पोहोचत नव्हते, तोपर्यंत या हरवलेल्या मुलांचा जीव टांगणीला लागला होता. मुसळधार पाऊस हिंस्त्रप्राण्यांचे भयानक आवाज आणि साप विंचवाची भीती या परिस्थितीत जंगलातील हा थरार मुलांचा अखेर संपला. रेस्क्यू टीम पोहचल्याने त्यांचा जीवात जीव आला. मात्र या विद्यार्थ्यांना निसर्गाने चांगलाच धडा शिकविला. कॉलेजला दांडी मारून निसर्गाचा सैर सपाटा जीवावर बेतला असता मात्र नशीब बलवत्तर म्हणून सर्वजण सुखरूप परतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed