विनित जांगळे, ठाणे : शाळा सुरू होताच विद्यार्थी आणि पालकांना सक्तीने शाळा प्रशासनाने नेमून दिलेल्या दुकानांमधून वह्या, पुस्तके व गणवेश घेण्यासाठी दबाव केला जातो. मात्र ठाण्याच्या श्रीनगर परिसरातील एका बड्या इंटरनॅशनल शाळेने चक्क विद्यार्थी-पालकांना महागडा ‘आयपॅड’ घेण्यासाठीच सक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सक्तीविरोधात काही पालकांनी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली आहे. मात्र मुलांच्या शिक्षणासमोर आता आयपॅडही घेऊ, असे म्हणत अनेकांनी या नव्या शिक्षण व्यवस्थेची वाट धरली आहे.ठाण्यातील श्रीनगर परिसरात असलेल्या बड्या इंटरनॅशनल शाळेने तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या नावाखाली यंदा आयपॅडची सक्ती केली आहे. विशेष म्हणजे, अॅपल कंपनीचा हा तब्बल ३० हजार पाचशे रुपये किंमतीचा आयपॅड शाळेतूनच घेण्याची टूम या शाळा प्रशासनाने राबवली आहे. त्यासाठी संबंधित कंपनीचे कर्मचारी शाळेच्या आवारातच ठाण मांडून बसले आहेत. यासोबत यंदा अचानक शाळा प्रशासनाने नवीन संस्थेची करार केल्याने विद्यार्थ्यांच्या फीमध्ये ४० हजारांची वाढ केल्याचा दावा पालकांनी केला असून नव्या शैक्षणिक प्रणालीला आत्मसात करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे शाळा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
अशा शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी खुद्द पालकच धावाधाव करतात. त्यानंतर शाळा प्रशासनाने अव्वाच्या सव्वा फी वाढ केल्याची ओरड करतात, असे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेले ते पत्र बाहेर कसे पडले? विखे पाटील समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता
स्विमिंग पूल ते मध्यान्ह भोजनवाढीव फी घेण्यामागे शाळेत स्विमिंग पूल उभारणे, शाळेत विद्यार्थ्यांना एक प्रकारचेच उच्च दर्जाचे सकस अन्न पुरवण्याचा कल असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. मात्र लाखोंची फी भरणाऱ्या पालकांचे कंबरडे त्यामुळे मोडत असल्याची कबुली पालकांनी फीवाढ मुद्द्यावर दिली.