• Fri. Mar 6th, 2026
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    अंबरनाथहुन सुटणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या लोकलमध्ये यार्डात प्रवेश करू न दिल्याने आज पुन्हा रेल्वे प्रवाशांचा अंबरनाथ रेल्वे स्थानकात रेल रोको

    अंबरनाथ रेल्वे स्थानकातून सकाळच्या वेळी अनेक लोकल सोडल्या जातात. यातील काही लोकल अंबरनाथ येथील रेल्वे यार्डात उभ्या असतात. अनेक प्रवासी जागा मिळवण्यासाठी यार्डातच लोकल मध्ये शिरून जागा पकडतात. त्यांनतर लोकल फलाटावर येते. मंगळवारी आणि बुधवारी नेहमीप्रमाणे काही प्रवासी लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी यार्डात पोहोचले. काही प्रवाशांनी लोकलमध्ये जागा मिळवली होती. मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना लोकलमधून उतरून फलाटावर जाऊन लोकल पकडण्याचे सुचवले. यातील अनेक प्रवाशांनी सुरुवातील रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना विरोध केला. त्यानंतर काही प्रवासी संतप्त झाले. आज बुधवारी पुन्हा रेल्वे प्रवाशांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात रेल रोको केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed