• Sat. Sep 21st, 2024
बिल्डिंगच्या जिन्यात गाठलं, करणी सेनेच्या अध्यक्षाला बेदम मारहाण; नेमकं प्रकरण काय?

नवी मुंबई (पनवेल) : पनवेल मध्ये करणी सेनेचे प्रमुख अजयसिंग सेंगर यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय सेंगर यांना पनवेल येथील अग्निशमन केंद्राजवळ जबरदस्त मारहाण करण्यात आली. अजयसिंग सेंगर यांनी संविधानाबद्दल अक्षेपार्ह भाषा वापरली असल्याचा आरोप भीम अनुयायांनी करत त्यांना मारहाण केली आहे. या घटनेनं सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नथुराम गोडसे यांची जयंती साजरी करणे तसेच महात्मा गांधी यांची जयंती काळा दिवस म्हणून साजरी करणे, अशी अनेक वादग्रस्त वक्तव्य अजयसिंग सेंगर यांच्यातर्फे करण्यात येतात. आता काही महिन्यांपूर्वी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातर्फे लिखित भारतीय संविधानाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत संविधान बदलण्याची मागणी केली होती. सेंगर यांच्या या वक्तव्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली होती. याच वक्तव्यामुळे पनवेल येथे दोन भीम अनुयायी यांच्या मार्फत अजयसिंग सेंगर यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी अजयसिंग सेंगर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पनवेल शहर पोलीस या मारहाण प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Maharashtra Monsoon : राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट, मुंबई, पुण्यासह ७ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
अजयसिंग सेंगर यांनी सांगितलं की, “मी वंचितांचे प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन श्रद्धांजली वाहिली त्याचा निषेध केला. त्यामुळे मला वंचितच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मी या हल्ल्याचा निषेध करतो. हा हल्ला माझ्यावरचा नाही तर हिंदू समजावरचा आहे.” तसेच हल्ला करणारे भीम अनुयायी सांगतात की “अजय सेंगर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो वा अन्य महापुरुष असो त्यांच्याबाबत ते नेहमीच अशा प्रकारचे वक्तव्य करतात.”

“आम्ही दोन वेळा आंदोलन करून इशारा दिला होता. मात्र, अजय सिंग सेंगर यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे आम्ही त्यांना चोप दिला आहे. आता पुढे जर अशा प्रकारची वक्तव्य केली तर पुन्हा एकदा अशाच प्रकारचा आम्ही चोप देऊ,” असा इशारा भीम अनुयायांनी दिला आहे.

Pune Crime: रिलेशनमध्ये भांडणं, ब्रेकअपनंतरही सनकी तरूणाची एकच मागणी; सदाशिव पेठेतील घटनेचं धक्कादायक सत्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed