अनिरुद्ध पॉलिटिक्स (Politics) या विषयात आपले पी. एचडी संशोधन करणार आहे. विशेषतः या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी एडिनबर्ग विद्यापीठानेच अनिरुद्धची निवड दोन प्रतिष्ठीत शासकीय स्कॉलरशिपसाठी केलेली आहे. एका स्कॉलरशिपचे मुल्य तब्बल दिड कोटी रूपये आहे. अनिरुद्धची आई एसटी महामंडळात वाहक आहे. तर त्याचे वडील हे हात मजूर आहेत.
अनिरुद्धने आपले शालेय शिक्षण ज्ञानमाता हायस्कूल येथून पूर्ण केले. पुढे त्याने आपले पदवीचे शिक्षण नरसम्मा महाविद्यालय तर समाजकार्य महाविद्यालय, बडनेरा येथून समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. समाजकार्य या विषयातच पुढे अनिरुद्धने देशातील नामांकीत टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई येथे एम. फिल (MPhil) चे शिक्षण घेतले. याच काळात, अनिरुद्धची युरोप येथे PhD करिता निवड झाली होती. पण त्याला कोविड आणि अन्य आर्थिक समस्येमुळे प्रवेश घेता आला नाही. म्हणून कोविड काळात शिक्षणामधे खंड पडू नये या हेतूने त्याने आयआयटी (IIT) बॉम्बे येथे पब्लिक पॉलिसी या विषयामध्ये आणखी एका पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले व सोबतच हार्वर्ड विद्यापीठा अंतर्गत असलेल्या समाज – अर्थशास्त्रीय लॅब मध्ये मुख्य निरीक्षक (रिसर्च) म्हणून काम केले.
IITचे शिक्षण घेत असतानाच अनिरुद्धने ब्रिटनमधील उच्च श्रेणीतील विद्यापीठांमध्ये PhD करता आवेदन करायला सुरुवात केली. तेथील PhD ची प्रवेश प्रक्रिया दीर्घकालीन असल्यामुळे त्याने आपल्या संभाव्य PhD पर्यवेक्षकांसोबत सातत्याने संपर्क ठेवून आपल्या रिसर्च प्रपोजल आणि एकूण आवेदनावर त्यांचे मार्गदर्शन घेवून आठ महिन्यांच्या तयारी नंतर शेवटी प्रबळ असे आवेदन सादर केले. चार महिन्यांच्या आत त्याची तीन महाविद्यालयांकडून PhD करिता निवड झाली. त्यापैकी अतिशय प्रतिष्ठित व जागतिक क्रमवारित १५ व्या क्रमांकावर असलेल्या “एडिनबर्ग यूनिवर्सिटी” नेही त्याची पॉलिटिक्स या विषयामधे PhD करिता निवड केली.
महत्त्वपूर्ण म्हणजे तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी एडिनबर्ग विद्यापीठानेच त्याची निवड दोन प्रतिष्ठित शासकीय शिष्यवृत्तिंकरिता केलेली आहे. एडिनबर्ग विद्यापिठाच्या शिष्यवृत्तिंसाठी संपूर्ण जगातून हजारो आवेदन येत असल्यामूळे ती अतिशय प्रतिष्ठित व जागतिक स्पर्धात्मक असलेली शिष्यवृत्ति मानली जाते. एका शिष्यवृत्तिचे मुल्य तब्बल दिड कोटी रुपये आहे. अनिरुद्धला दोन शिष्यवृत्तिपैकी एक शिष्यवृत्ती निवडून आपला एडिनबर्ग विद्यापीठात PhD चा प्रवास सुरू करण्याची संधी प्राप्त झालेली आहे.
आपले PhD चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मायदेशात परतून आपल्या विदर्भात एक जागतिक दर्जाचे बहुविद्याशाखीय शैक्षणिक संस्थान स्थापित करण्याचा अनिरुद्धचा मानस आहे. अनिरुद्ध आपल्या यशाचे श्रेय आई-वडील बहीण, मार्गदर्शक आणि मित्रांना देतो. अनिरुद्धनी घेतलेली ही गगन भरारी अनेक तरुणांना प्रेरणादायी ठरत आहे.