अमरावती: शरीराने अपंग आणि मनाने खचलेले अनेक लोक आपण रस्त्याच्या कडेला भीक मागून जीवन जगताना बघतो. मात्र दोन्ही पायाने अपंगत्व असताना सुद्धा अमरावती येथील शेख अब्दुल शेख अब्रार या तरुणाने अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धेत पदक जिंकून आणली आहे. अपंगात्वामुळे आयुष्यात आलेल्या नकारात्मकतेवर मात करत अब्दुलने सकारात्मक जीवनशैली स्वीकारली. त्यातूनच पिळदार शरीर तयार करत तो अनेकांचा प्रेरणास्त्रोत बनला आहे.
मुळ वाशिम जिल्ह्यातील शेख अब्दुल शेख अब्रार याला लहानपणी पोलिओ झाला होता. घरी भाऊ जिम, व्यायाम आणि कसरती करत असताना त्याने आपल्या भावाला बघितले. तेथूनच त्यांनी मनात जिद्द पकडली की पोलिओमुळे आलेल्या नकारात्मकतेवर सकारात्मकतेने विजय मिळवण्याची. अब्दुल औद्योगिक प्रशिक्षण घेण्यासाठी अमरावती येथे अमरावती येथील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत तो राहू लागला. दरम्यान त्यांनी योग व्यायाम कसरती आणि जिम करण्यास सुरुवात केली.

प्रचंड मेहनत करून अब्दुलने पिळदार शरीर निर्माण केले. त्यातूनच त्याला कल्पना सुचली ती बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये उतरण्याची. धडधाकट शरीरयष्टी असणाऱ्या लोकांच्या स्पर्धेत दोन्ही पायांनी अपंग असणारा अब्दुल टिकणार नाही, अशी अनेकांना वाटत होते. मात्र प्रचंड मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्हा आम्हालाही लाजवेल एवढ्या सहज आणि नेटक्या पद्धतीने तो बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये सहभागी होतो. तसेच विजय सुद्धा मिळवतो. अब्दुलचा हाच प्रवास सर्वसामान्य युवकांकरिता प्रेरणादायी ठरत आहे.