• Sat. Sep 21st, 2024
शिखर बँकेच्या घोटाळ्यावरून मोदींची टीका, सुप्रिया सुळे निशाण्यावर; शरद पवार म्हणाले…

पुणे: राज्यात सध्या नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्यातच व्यस्त आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर टीका करत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. टीका करताना मोदींनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनाही सोडले नाही. त्यांच्यावरही टीका करत वक्तव्य केले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असल्याचे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, असं एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नाही. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरही घोटाळ्यांचा आरोप आहे. यानंतर त्यांनी सुप्रिया सुळेंवरही टीका केली. तुम्हाला शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करा. मात्र तुम्हाला जर तुमच्या मुला-मुलींचं आणि नातवंडांचं भलं करायचं असेल तर तुम्ही भाजपाला मतदान करा, असे मोदी यावेळी म्हणाले.
पवारांची ‘ती’ खेळी म्हणजे मुत्सद्देगिरी, फडणवीसांच्या वक्तव्याला आठवलेंनी छेद दिल्याने चर्चा
पंतप्रधान मोदींच्या या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. पवार म्हणाले की, पंतप्रधानांनी देशवासियांबद्दल काय बोललं पाहिजे याचा नमुना देशासमोर ठेवला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे. शिखर बँकेचा त्यांनी उल्लेख केला. मी कधी शिखर बँकेचा मेंबर नव्हतो. मी शिखर बँकेतून कधीही कर्ज घेतले नाही. मी त्या संस्थेचा कधीच सदस्य नव्हतो. याबाबत बोलणे कितपत ठीक आहे? त्यांनी जो उल्लेख केला त्यात शिखर बँक हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यात माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही हे स्पष्ट झालेले आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव घेण्याचे काहीही कारण नाही. अशा इन्स्टिट्यूट सोबत त्या राहत नाहीत हे बहुतांश लोकांना माहीत आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर देशातील विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात. देशाच्या सम

मी बरीच वर्षे फडणवीसांचा मालक होतो, खडसेंचा पलटवार

स्येबाबत चर्चा करतात ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे विधाने केली जातात. यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही.

यावेळी शरद पवारांनी बीआरएसमध्ये प्रवेश करणाऱ्या भगीरथ भालकेंवरही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एखादी व्यक्ती गेली तर फार चिंता करायची गरज नसते. भालके यांना आम्ही ज्या वेळेला विधानसभेला संधी दिली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं की आमची ही निवड चुकीची होती. त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. तसेच केसीआर यांच्यावर बोलताना पवार म्हणाले, शेजारच्या राज्याचे मुख्यमंत्री इथे आले दर्शनासाठी त्यावर हरकत घ्यायचं काही कारण नाही. परंतु जे काही विठ्ठलाची पूजा हा वेगळा भाग पण त्याशिवाय जे काही जबरदस्त ताकद दाखवण्याचा प्रयत्न शेकडो गाड्या आणि बाकीच्या इतर गोष्टी हे चिंताग्रस्त आणि वादग्रस्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed