• Mon. Nov 25th, 2024

    मडगाव-मुंबई वंदे भारत CSMTमध्ये दाखल, प्रवाशांचे स्वागत, CM शिंदे यांनी साधला संवाद

    मडगाव-मुंबई वंदे भारत CSMTमध्ये दाखल, प्रवाशांचे स्वागत, CM शिंदे यांनी साधला संवाद

    Madgaon Mumbai Vande Bharat Reaches CSMT Station : मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात स्वागत झाल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्सप्रेस मधील प्रवाशांचा प्रवास अनुभव जाणून घेत संवाद साधला.

     

    मडगाव-मुंबई वंदे भारत CSMTमध्ये दाखल
    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ९ वर्षे देशात सुशासनाची, जनसेवेची गेली आहेत. याचा एकभाग म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे सर्वांनी स्वागत करायला हवे. केंद्राप्रमाणे राज्य सरकार देखील रेल्वे प्रकल्पासाठी आग्रही आहे. नवे सरकार स्थापनेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत रखडलेल्या रेल्वे प्रकल्पाला निधी देत प्रकल्प मार्गी लावले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

    कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे आणि प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी विशेष कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
    Vande Bharat Express: मुंबई-मडगावसह ५ वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण, कोणत्या मार्गावरील प्रवास वेगवान? जाणून घ्या
    कोकणवासियांसह गोव्यात जाणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना जलद आणि वेगवान पर्याय वंदे भारतमुळे उपलब्ध होणार आहे. मडगाव आणि मुंबई दरम्यान अंतर कापण्यासाठी अकरा-बारा तास लागतात. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसमुळे हे अंतर अवघ्या आठ तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या तीन ते चार तासांची बचत होणार आहे.
    Maharashtra Monsoon : राज्यावर पावसाचं सावट, उद्या मुंबईला येलो तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
    सोलापूर, शिर्डी, अहमदाबाद, नागपूर आणि बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस राज्यात धावत आहेत. कोकणातील पर्यटनाला देश-विदेशातील पर्यटकांचा वर्दळ वाढविण्यासाठी जलद आणि आरामदायी सुविधा मिळण्यासाठी रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये अतिरिक्त थांबा द्यावा, अशी मागणी मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

    अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहाणी

    राणी कमलापती (भोपाळ) स्टेशनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवत प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या केल्या आहेत. देशात सध्या २३ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या सर्व राज्यात वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed