• Sat. Sep 21st, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक पंढरपूर दौरा, दुकानं बंद केल्याने व्यापाऱ्यांचा तीव्र संताप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक पंढरपूर दौरा, दुकानं बंद केल्याने व्यापाऱ्यांचा तीव्र संताप

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेडहून सोलापूर विमानतळावर आले. सोलापूरहून ताबडतोब पंढरपूरकडे रवाना झाले. आषाढी वारी आधी पंढरपूर येथील पाहणी करून पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. सोलापुरात मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासनाने ताबडतोब सर्व तयारी करत शहरातील बंदोबस्त वाढविला होता. विमानतळापासून ते पंढरपूरपर्यंत रस्त्यावर पोलीस बल तैनात करण्यात आले होते. शहरात मुख्य चौकातही कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. शिंदे गटाचे सर्व नेते मंडळी विमानतळावर हजर झाले होते. विमानतळापासून ते शहरातील मुख्य चौकात असलेल्या दुकांनधारकांना दुकाने बंद करायला लावल्याने व्यापारी वर्गांने मुख्यमंत्र्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.सोलापूर-पुणे महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, महिलेचा मृत्यू; शिवसेना नेत्याचा राडा
व्हिआयपी मार्गावरील दुकाने बंद

सोलापूर विमानतळापासून ते रेल्वे स्थानक व बस स्थानकापर्यंत व्हिआयपी मार्ग आहे. मुख्यमंत्री असो किंवा इतर मंत्री असो, सर्व नेते मंडळींचा ताफा याच मार्गावरून जातो. रविवारी दुपारी अचानकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर मार्गे पंढरपूरकडे जाणार असल्याने प्रशासनाची सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. विमानतळापासून व्हिआयपी मार्गावरील सर्व दुकाने दुपारपासून बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. पोलिसांनी दुकाने बंद करायला लावल्यामुळे व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, विठुराया-रखुमाईचं मंदिर राहणार २४ तास खुलं
मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये केली तयारीची पाहणी

सोलापूर शहरातून जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा भैय्या चौक येथील दिलीप कोल्हे यांच्या परिसरात थांबला. त्याठिकाणी त्यांचा सत्कार करून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडे एकनाथ शिंदे रवाना झाले. आषाढी वारीनिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथील नियोजनाबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांसोबत चर्चा केली. विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आणि मुंबईकडे रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed