• Sat. Sep 21st, 2024

डोक्यावर कर्जाचा बोजा, फेडणं अशक्य झालं; तरुणाने मित्रांना साथीला घेत केलं धक्कादायक कृत्य

डोक्यावर कर्जाचा बोजा, फेडणं अशक्य झालं; तरुणाने मित्रांना साथीला घेत केलं धक्कादायक कृत्य

अकोला : डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी २५ वर्षीय तरुणांनं आपल्या तीन मित्राच्या मदतीने चोरी केल्याचा प्रकार समोर आला होता. अकोला शहरातील डाबकी रोड पोलिस ठाण्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील राधास्वामी सत्संग केंद्राजवळील एका गोदामाला चौघांनी लक्ष्य करत या गोदामातील चौकीदाराचे हातपाय बांधून तब्बल ५० लाख रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या सिगारेटच्या पेट्यांवर हात साफ केल्याचा प्रकार उघड झाला होता.

या चोरी प्रकरणी अकोला पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीला गेलेला सिगारेट मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालाची किंमत सुमारे ५४ लाख १८ हजार इतकी आहे. आतीश सुनिल मलीये (वय २५ रा. गौसीया मज्जीद गुलझारपुरा अकोला) असं या आरोपीचे नाव असून, आतीशवर तब्बल २ लाखांवर कर्ज वाढले होते. म्हणून त्यानं ही चोरी केल्याचं पोलीस चौकशीत समोर आले आहे.

कारमध्ये कोंबून ‘आनंदी’ला पळवलं, मालकाची थेट पोलिसांत तक्रार

काय आहे संपूर्ण प्रकरण?
अकोला शहरातील डाबकी रोड भागातील राधास्वामी सत्संग जवळ मनोहर मोटवाणी याचं सिगरेटचे गोदाम आहे. या गोदामात २८ मे रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास येथील चौकीदाराचे काही अज्ञात तीन लोकांनी बळजबरी हातपाय बांधून ठेवले. त्यानंतर गोदामचे शटर उचकटून ५० लाख रुपयांचा मुद्देमाल या तिघांनी चोरून नेला होता.

यात विविध कंपनीच्या सिगारेट पाकिटांचा समावेश होता . चोरी प्रकरणी डाबकी पोलिसांत ३९२, ३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या हाती घेतला आणि तपासाची सूत्र वेगात फिरवली . तपासादरम्यान, चोरीतील मुख्य आरोपी आतीश सुनील मलीये(रा. गौसीया मज्जीद गुलजार पुरा अकोला) हा असल्याच समजलं. यानुसार त्याचा शोध घेवून आतिशला ताब्यात घेण्यात आले.

मुलीला सर्पदंश, रुग्णालयात २ तास तंत्रमंत्र; डॉक्टर बघत बसले, अखेर ज्याची भीती होती तेच घडलं
ताब्यात घेतलेल्या आतिशकडे कसून विचारपुस केली असता त्यानं त्याच्या तीन मित्रांच्या मदतीनं नंदलाल मोटवाणी याच्या गोदामात चोरी केल्याचं कबूल केलं. आतिशसह भावेश गजानन भिरड (वय २५ वर्ष धंदा. खाजगी नोकरी रा. गायत्री नगर जुनेशहर अकोला), शाम सुखदेव ताथोड (वय २३ वर्ष धंदा. मजुरी, रा. गायत्री नगर जुने शहर अकोला) आणि नागेश विजय कुटाफळे (वय २० वर्ष धंदा. मजुरी रा. शिवचरण पेठ, जुने शहर अकोला) यांना त्याच्या मित्रांनादेखील अटक करण्यात आली आहे.

तब्बल ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त:
आरोपींची चोरी केलेल विविध कंपनीचे सिगारेट अकोला पोलिसांनी जप्त केले आहेत. या सिगारेट पाकिटांची किंमत तब्बल ४३ लाख ७७ हजार ८५० रूपये आहे. चोरीच्या गुह्यात वापरण्यात आलेलं चारचाकी मालवाहू वाहनही जाजप्त करण्यात आले आहे. या वाहनाची किंमत ८ लाख रुपये असून दोन मोटार सायकल, ४ विविध कंपनीचे मोबाईल, दोन चाकु असा एकत्रित ५४ लाख १८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कामगिरी पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, एपीआय गोपाल ढोले, पोलीस कर्मचारी खुशाल नेमाडे, आकाश मानकर यांच्या पथकाने केली.
Pune News: लोखंडी तारांच्या कंपाऊंडला हात लागताच करंट तरुणाच्या अंगात शिरला अन्…
डोक्यावर कर्ज वाढल्यानं निवडला चोरीचा मार्ग:

आरोपी आतिशसह भावेश भिरड, शाम ताथोड आणि नागेश कुटाफळे हे चौघेही चांगले मित्र आहे. दरम्यान, आतिश याच्या डोक्यावर २ लाख ५० रुपयांहून अधिक कर्ज झालं होतं. आतिश हा मालवाहू वाहनाचा चालक आहे. मालवाहून न्यायचं तो काम करायचं, यातून अपेक्षा नुसार पैसे मिळत नसल्याने कर्ज फेडणही त्याच्यासाठी कठीण झालं होतं. अखेर झटपट कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी करण्याचा पर्याय निवडला. आणि आपल्या जिवलग तीन मित्रांच्या मदतीने डाबकी रोड भागातील सिगारेटच्या गोदामातील तब्बल ५० लाखांच्या सिगारेट चोरून नेल्या. परंतु मुद्देमाल विकण्याच्या बेतात असताना तो अकोला पोलिसांच्या जाळ्यात आला. त्यामुळे या सर्वांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed